Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, पुलवामामध्ये 3 संशयितांना अटक, शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

पुलवामा येथे तीन संशयितांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस आणि लष्कर संशयितांची चौकशी करत आहेत

143
Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, पुलवामामध्ये 3 संशयितांना अटक, शस्त्रास्त्रांचा साठा जप्त
Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, पुलवामामध्ये 3 संशयितांना अटक, शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

जम्मू-काश्मीरमधील पुंछ दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. पुलवामा येथे तीन संशयितांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस आणि लष्कर संशयितांची चौकशी करत आहेत. (Pulwama)

मिळालेल्या माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामाच्या पंजू आणि गामीराजमध्ये एक संयुक्त कारवाई आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेतले. तसेच दोन पिस्तुल व युद्धसदृश वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई होती.(Pulwama)

(हेही वाचा : Ajit Pawar : मी जे सांगितलं ते फायनल; काल आवाहन दिलं आणि अजित पवार थेट त्यांच्या मतदार संघात)

 
पुंछमध्ये २१ डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले. हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व माहिती जाणून घेतली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील बुधवारी (२७डिसेंबर) या ठिकाणी भेट देणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.