Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक

मेगाब्लॉकच्या कालावधीत २ गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल प्रवाशांनी लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

107
Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक
Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वेमार्गावर (Konkan Railway) मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ला अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खेडमधील कळंबणी बुद्रुक तसेच चिपळूण तालुक्यातील कामथे स्थानकादरम्यान रेल्वेचा हा मेगाब्लॉक असेल.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी दुपारी १२:४० पासून ३ वाजून १० मिनिटांपर्यंत अडीच तासांचा हा मेगाब्लॉक असेल. यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉकमुळे ०२१९७ कोईमतूर ते जबलपूर ही २५ डिसेंबरला प्रवासाला निघालेली विशेष रेल्वे गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकादरम्यान १ तास ४५ मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे, तर सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शनदरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी (१०१०६) असेल. २६ डिसेंबरची ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरीदरम्यान १ तास १५ मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत २ गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल प्रवाशांनी लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : मी जे सांगितलं ते फायनल; काल आवाहन दिलं आणि अजित पवार थेट त्यांच्या मतदार संघात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.