Corona New Variant: कोरोनाच्या JN.1चा संसर्ग देशात वाढतोय, डब्ल्यूएचओकडून सतर्कतेचा इशारा

कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन डब्ल्यूएचओकडून करण्यात आले आहे.

172
Corona New Variant: कोरोनाच्या JN.1चा संसर्ग देशात वाढतोय, डब्ल्यूएचओकडून सतर्कतेचा इशारा
Corona New Variant: कोरोनाच्या JN.1चा संसर्ग देशात वाढतोय, डब्ल्यूएचओकडून सतर्कतेचा इशारा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगाने पसरत आहे. त्यामुळे देखरेख आणि सिक्वेंन्सिंगची प्रणाली बळकट करा, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने आशियातील देशांना दिल्या आहेत. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन डब्ल्यूएचओकडून करण्यात आले आहे.

(हेही पहा – Earthquake : पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के )

कोरोनाच्या नव्या JN.1चा संसर्ग काही देशांमध्ये वाढल्याचे लक्षात येत आहे. सध्या हिवाळी वातावरण असल्याने प्रसारास गती मिळत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याशिवाय वर्षअखेर आणि सुट्ट्यांच्या कालावधीत लोकं मोठ्या संख्यने घराबाहेर पडतात. त्यामुळे गर्दीमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, लक्षणे असल्यास मास्क वापरावा, चाचणी करावी, पॉझिटिव्ह आल्यास स्वत:ला विलग ठेवावे, असे आवाहनी प्रशासनाने केले आहे. देशातील बाधितांमध्ये ६३ जणांमध्ये नव्या “जेएन-१” व्हेरिएंटचे ६३ रुग्ण आढळले आहेत, महाराष्ट्रात ५० संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही  पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.