Israil : इस्रायली डॉक्टरांचा चमत्कार; शरीरापासून वेगळं झालेलं शीर डॉक्टरांनी पुन्हा जोडलं

140

आपल्या पुराणांच्या कथांपैकी श्रीगणेश म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची कथा सर्वांना माहितीच आहे. महादेवांनी त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या धडावर हत्तीचं डोकं बसवून त्याला जिवंत केलं होतं. ही कहाणी आपणां सर्वांनाच माहिती आहे. अशाप्रकारचीच एक सत्यघटना इस्रायलमध्ये घडली आहे. इस्रायलच्या डॉक्टरांनी एका मुलाचं अपघातात धडापासून वेगळं झालेलं, फक्त त्वचेने जोडून राहिलेलं डोकं शस्त्रक्रिया करून पुन्हा यशस्वीपणे ते धडावर बसवलं. जगभरातले डॉक्टर हा एक चमत्कार मानत आहेत आणि त्या इस्रायलच्या डॉक्टरांचं खूप कौतुक करत आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

द टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार असं कळलं आहे की, फिलिस्तान येथे राहणारा सुलेमान हसन नावाचा बारा वर्षांचा मुलगा बाईकवरून जात असताना एका कारने त्याला टक्कर दिली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की, त्याची कवटी आणि धडाला जोडणारा मज्जातंतू म्हणजेच मणक्याचा भाग पूर्णपणे वेगळा झाला होता. पण त्याच्या त्वचेचा काही थर अजूनही जोडलेला होता. अशा प्रकारे जखम होणे खूपच रेअर असते. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये जीव वाचण्याची शक्यता खूपच कमी असते. त्या मुलाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सुलेमानला येरुसलम हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिटमध्ये तातडीने नेण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या एका टीमने लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी कितीतरी तास आटोकाट प्रयत्न केले. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुलेमानच्या जखमा जून महिन्यातच भरल्या होत्या पण अजूनही त्या मुलाला अंडर ओब्जर्व्हेशन ठेवणे खूप गरजेचे होते. डॉक्टर ओहव यांनी टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या माहितीमध्ये ते म्हणाले की, अशा केसेसमध्ये सत्तर टक्के लोकांचा त्वरित मृत्यू होतो. या मुलाला झालेली ही जखम खूपच रेअर होती. आम्ही सर्वांनी या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आमचे सगळे वैद्यकीय ज्ञान पणाला लावले आणि अखेर आम्ही यशस्वी झालो. शस्त्रक्रिया तेव्हाच शक्य असते जेव्हा शरीरातल्या नसा पूर्णपणे सुरक्षित असतील.

सुलेमानच्या बाबतीत तसेच घडले. त्याचा मणका तुटलेला असला तरीही त्याच्या त्वचेतून जाणाऱ्या सगळ्या नसा सुरक्षित होत्या ज्यामुळे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा होत होता. त्यामुळेच आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकलो. हे खरंतर एखाद्या चमत्कारासारखेच आहे. सौभाग्याने त्यावेळेस जेष्ठ डॉक्टर इनाव तिथे उपस्थित होते. त्यांच्या निगराणीखाली ही सर्जरी करण्यात आली. तुटलेल्या भागांमध्ये नव्या प्लेट्स बसवून तो भाग दुरुस्त करण्यात आला. आता सुलेमानला कोणत्याही प्रकारची न्यूरॉलॉजीकल समस्या नाहीय. तो स्वतः चालू फिरू शकतो. सुलेमानचे बाबा म्हणतात, माझ्या एकुलत्या एका मुलाचे प्राण डॉक्टरांनी वाचवले, मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.