Israel-Hamas conflict: ‘Google’कडून इस्त्रायल आणि गाझामधील लाईव्ह ट्रॅफिक कंडीशन फिचर बंद, काय आहे नेमके कारण…

86
Israel-Hamas conflict: 'Google'कडून इस्त्रायल आणि गाझामधील लाईव्ह ट्रॅफिक कंडीशन फिचर बंद, काय आहे नेमके कारण...
Israel-Hamas conflict: 'Google'कडून इस्त्रायल आणि गाझामधील लाईव्ह ट्रॅफिक कंडीशन फिचर बंद, काय आहे नेमके कारण...

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध (Israel-Hamas conflict) सुरू आहे. यादरम्यान गुगलने इस्त्रायल आणि गाझामधील लोकप्रिय अॅपवरून लाईव्ह ट्रॅफिक कंडीशन फिचर बंद केल्याची माहिती समोर आली आहे. हे फिचर बंद (Google Live traffic condition ) केल्याचा परिणाम असा की, यामुळे इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेल्या गुगल मॅप, Wazeअॅपमध्ये लाईव्ह ट्रॅफिक कंडिशन पाहण्याची सुविधा आता राहणार नाही.

एका मिडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली लष्कराच्या सांगण्यावरून या टेक कंपन्यांनी त्यांचे हे फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा पहिलाच निर्णय नसून यापूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्येही अशीच बंदी घालण्यात आली होती. यामध्ये फक्त गुगलचाच नाही तर अॅपलसारख्या मोठ्या कंपनीचाही समावेश आहे.

(हेही वाचा – Hardik Pandya Health Update : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपला मुकणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट )

इस्रायली लष्कराची गुगलला विनंती…

इस्त्रायली सैन्याच्या विनंतीवरून Google आपल्या डेटामधून रियल टीन क्राउडिंग डेटा काढून टाकत आहे. याचे कारण असे की, या फिचरच्या मदतीने सैन्याच्या हालचाली उघड होण्याची शक्यता असते. हमासपर्यंत ही माहिती थेट पोहोचली, तर ते इस्रायली लष्करासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे इस्त्रायली लष्कराकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीबाबत Google कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे. तो असा की, Maps आणि Waze सारखे अॅप्स यापुढे रिअल टाइम ट्रॅफिक दाखवणार नाहीत, मात्र जे ड्रायव्हर्स त्यांच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी Google Mapचा वापर करतात त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी अंदाजे वेळेची माहिती मिळायला मदत होऊ शकते.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.