Indigo Emergency Landing : मुंबई ते रांची विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू, नागपूर विमानतळावर अनियोजित लँडिंग

86
Indigo Emergency Landing : मुंबई ते रांची विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू, नागपूर विमानतळावर अनियोजित लँडिंग

इंडिगो (Indigo Emergency Landing) कंपनीच्या विमानातून मुंबई ते रांची या प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाला. त्यामुळे या विमानाचे नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनियोजित लँडिंग करावे लागले.

डी. तिवारी असे या प्रवाशाचे (Indigo Emergency Landing) नाव आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईहून रांची येथे प्रवास करत असताना रात्री 8 च्या दरम्यान त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अचानक तब्येत बिघडल्यामुळे विमान नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड (Indigo Emergency Landing) करण्यात आलं. त्यानंतर त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रवाशाला किडनी आणि क्षयरोग झाला. या प्रवासात त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या, अशी माहिती रुग्णालयाचे अधिकारी डॉ. एजाज शमी यांनी दिली याशिवाय त्यांनी पुढे सांगितले की, ‘त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला.’ , असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Abortion : बलात्कार पीडितेला सर्वोच्च न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी)

इंडिगो एअरलाईन्सचे (Indigo Emergency Landing) या घटनेबाबत म्हणणे आहे की, ‘मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगो विमान 6E 5093 यामधून डी. तिवारी प्रवास करत होते, मात्र तात्काळ वैद्यकीय उपचारांकरिता विमान नागपूरला वळवण्यात आले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच ते मरण पावले.आम्ही त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांच्या दु:खात सहभागी आहोत.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.