Indian Railway: १ एप्रिलपासून रेल्वेच्या नियमांमध्ये ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या…

भारतीय रेल्वेने हा दंड भरण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारण्याची पद्धत सुरू केली आहे.

6314
Indian Railway: १ एप्रिलपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल, जाणून घ्या...
Indian Railway: १ एप्रिलपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल, जाणून घ्या...

भारतीय रेल्वे सेवा ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रवाशांसाठी अत्यंत सुखकारक वाहतुकीचे साधन मानली जाते. रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. अत्यंत सोपा आणि सोयीस्कर मानला जाणारा हा प्रवास देशभरातील दररोज कोट्यवधी प्रवासी करतात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा दिल्या जातात. १ एप्रिलपासून रेल्वेच्या नियमांता आता नवीन बदल होणार आहे.

बदललेल्या नियमानुसार, जर विना तिकिट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेलेल्या प्रवाशांना आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो. भारतीय रेल्वेने हा दंड भरण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारण्याची पद्धत सुरू केली आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी १ एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल रेल्वे करणार आहे. रेल्वेच्या नवीन नियमामुळे रेल्वेने विनातिकिट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जनजागृती)

जनरल तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल क्यूआर कोड
रेल्वे स्थानकावरील मोठ्या गर्दीला पर्याय म्हणून रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल उचलेले आहे. रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आता क्यूआर कोड स्कॅन करून दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकिट तपासनिसांना हॅंडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करताना ज्या प्रवाशांकडे तिकिट नसेल आणि पैसेही नसतील अशावेळी डिजिटल पेमेंट करू शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो. त्यामुळे १ एप्रिलपासून रेल्वेच्या जनरल तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल क्यूआर कोडलादेखील मान्यता देण्यात आली आहे. यामुळे युपीआयद्वारे जनरल रेल्वे तिकिटदेखील खरेदी करू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.