Church : मंगळुरु येथे पाद्र्याकडून वृद्धाला अमानुष मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच गुन्हा दाखल

208
ख्रिस्ती पाद्र्यांकडून कधी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात तर कधी बळजबरीने किंवा खोटी प्रलोभने दाखवून धर्मांतर करत असल्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. आता मंगळुरु येथील एका चर्चचा (Church) पाद्री हा एक वृद्धाला अमानुष मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा व्हायरल झाले तेव्हा मात्र खळबळ उडाली. या प्रकरणी विठ्ठल पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लागलीच चर्चचे फादर जे बी साल्दान्हा आणि रॉय कॅस्टेलिनो यांनी संयुक्तपणे प्रसिद्धी पत्रक काढून पाद्री  नेल्सन ऑलिव्हरा याला प्रिस्ट ऑफ क्राइस्ट द किंग चर्च, मानेला यांच्या मंडळामधून हाकलण्यात आल्याचे म्हटले आहे.

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल 

पाद्री नेल्सन ऑलिव्हरा याने 29 फेब्रुवारी 2024 रोजी एका वृद्धाला अमानुष मारहाण केली. त्यावेळी त्या वृद्धांची पत्नी पाद्र्याला विनवणी करत होती, मात्र तरीही पाद्री नेल्सन ऑलिव्हरा याने त्या वृद्धाला मारहाण सुरूच ठेवली. या मारहाणीचा व्हिडिओ अर्थात सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. हा वृद्ध चर्चमध्ये (Church) प्रार्थनेला येत नव्हता म्हणून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे सोशल मीडियात नेटकरी म्हणत आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी विठ्ठल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर चर्चच्या फादरने प्रसिद्धीपत्रक काढून संबंधित पाद्रीला हटवण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.