Threat to Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

फडणवीसांना धमकी देणारा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता.

140
Devendra Fadnavis : भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रक्षोभक भाषेचा वापर करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीचा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या घटनेबाबत पुढिल तपास करत आहेत.

किंचक नवले असे या आरोपीचे नाव आहे. फडणवीसांना धमकी देणारा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता. त्यामुळे तो वेशांतर करून फिरत होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी (Santa Cruz Police) शनिवारी आरोपी किंचक नवले याला साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Church : मंगळुरु येथे पाद्र्याकडून वृद्धाला अमानुष मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच गुन्हा दाखल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.