Chhatrapati Shivaji maharaj Terminus : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा रोमहर्षक इतिहास

170
Chhatrapati Shivaji maharaj Terminus : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा रोमहर्षक इतिहास
Chhatrapati Shivaji maharaj Terminus : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा रोमहर्षक इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji maharaj Terminus) हे मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानक आणि शहराच्या मध्य रेल्वे प्रणालीचे मुख्यालय आहे. हे महत्वाचे रेल्वे स्थानक १८७८ – १८८७ दरम्यान बांधले गेले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji maharaj Terminus) स्थानक अनेक पर्यटकांना भुरळ पाडते. हे विशाल स्थानक मुंबईची शान वाढवते.
मुंबईतील बोरी बंदर परिसरात, आयात आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले एक प्रमुख बंदर, बोरी बंदर रेल्वे स्थानक बंद करुन हे स्थानक बांधण्यात आले होते. त्यावेळी बॉम्बे (आताचे मुंबई) हे एक प्रमुख बंदर शहर होते. व्यापाराच्या वाढीसाठी आणि सुलभतेसाठी राणी व्हिक्टोरियाच्या नावावर व्हिक्टोरिया टर्मिनस हे स्थानक बांधण्यात आले. (Chhatrapati Shivaji maharaj Terminus)
ब्रिटीश अभियंता वास्तुविशारद फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या स्टेशनची रचना केली होती. १८७८ मध्ये कामाला सुरुवात झाली.  या स्थानकाची शैली १८७० च्या मुंबईतील इतर सार्वजनिक इमारतींसारखीच आहे. आज या रेल्वे स्थानकावर रात्री रोषणाई केली जाते. मुंबईकर दोन मिनिटे थांबून या सुंदर वास्तूचे दर्शन घेतात.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji maharaj Terminus) मध्ये एकूण १८ प्लॅटफॉर्म आहेत. ७ प्लॅटफॉर्म उपनगरीय EMU ट्रेनसाठी आहेत आणि ११ प्लॅटफॉर्म (प्लॅटफॉर्म ८ ते प्लॅटफॉर्म १८) लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. राजधानी, दुरांतो, गरीब रथ आणि तेजस एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून सुटतात. १६ एप्रिल २०१३ रोजी येथे वातानुकूलित वसतिगृहांचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेत पुरुषांसाठी ५८ आणि महिलांसाठी २० बेड्स आहेत.
पूर्वी या स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा व्ही. टी (short for Victoria Terminus किंवा V. T. ) म्हटले जायचे. पण १९९६ मध्ये मार्च महिन्यात  मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या नावावरून स्टेशनचे नाव “छत्रपती शिवाजी टर्मिनस” (CSMT) असे ठेवण्यात आले. पुढे २०१७ मध्ये या स्थानकाचे “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” (CSMT) असे पुन्हा नामकरण करण्यात आले. सुरुवातील महाराज असा उल्लेख नव्हता मात्र आता महाराज असा उल्लेख करत नाव बदलले ते योग्यच झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji maharaj Terminus) हे स्थानक मुंबईची शान आहे. मात्र २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचा हल्ला झाला. दोन पाकिस्तानी दहशतवादी पॅसेंजर हॉलमध्ये घुसले, त्यांनी गोळीबार केला आणि लोकांवर ग्रेनेड फेकले. या इस्लामी जिहादी हल्ल्यात ५८ लोक मारले गेले आणि १०४ जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजमुळे कसाबची ओळख पटली. त्याला पकडण्यात आले आणि २०१० मध्ये कसाबला या नीच कृत्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २०१२ मध्ये त्याला फाशी देण्यात आली.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.