एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात येणार उष्णतेची लाट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

3

एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्य दिवसांपेक्षा उष्णता वाढणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

( हेही वाचा : दुबईला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग; नक्की काय घडले?)

महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?

  • पाण्याची बाटली जवळ ठेवा
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, मऊ, कॉटनचे कपडे वापरा.
  • आहारात फळे, ताक, लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, दही याचा समावेश करा.

काय करू नये?

  • दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  • मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.