HPV Vaccine : धारावीतील 5 हजार मुलींचे मोफत एचपीव्ही लसीकरण

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष मोहीम

141
HPV Vaccine : धारावीतील 5 हजार मुलींचे मोफत एचपीव्ही लसीकरण
HPV Vaccine : धारावीतील 5 हजार मुलींचे मोफत एचपीव्ही लसीकरण

सर्व्हायकल कॅन्सरच्या विरोधातील लढा सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी एका विशेष मोहिमेचे आयोजन धारावीमध्ये केले. या मोहिमेअंतर्गत धारावीतील 9 ते 14 वयोगटातील 5000 मुलींचे मोफत HPV (ह्युमन पॅपीलोमाव्हायरस) लसीकरण करण्यात आले. धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेला धारावीतील विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला. (HPV Vaccine)

देशभरात महिलांमधील सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. या पार्श्वूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कॅन्सरविरोधी लढा प्रभावीपणे उभा करण्याचे आवाहन केले होते. यानंतर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी पुढाकार घेत पहिल्यांदाच धारावीतील मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आयोजित केली. पहिल्या टप्प्यात धारावीतील 5000 मुलींचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला बिर्ला फाउंडेशन आणि रोटरी क्लब, ठाणे हिल्स यांचे सहकार्य लाभले. (HPV Vaccine)

(हेही वाचा – Rahul Shewale : गोवंडी येथे मोठ्या जल्लोषात मराठा भवनाचे लोकार्पण)

सर्व्हायकल कॅन्सर प्रतिरोधक लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात एकूण 50000 मुलींना सी एस आर च्या माध्यमातून मोफत HPV लस देण्यात येणार आहे. आगामी काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविण्यात येईल.
– खासदार राहुल शेवाळे

धारावीतील गणेश मंदिर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेदरम्यान, प्रगती होलिस्टिक डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने खासदारांच्या हस्ते विद्यार्थिनींना मोफत लॅपटॉप वितरण करण्यात आले. (HPV Vaccine)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.