केवळ बारा मिनिटांत ‘असा’ मिळवा मालमत्तेचा ‘सातबारा’

110

आपण एखादी मालमत्ता विकत घेतल्यानंतर तिचा 7/12 काढण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात त्याप्रमाणे 7/12 काढताना अडचणी येत असतात. ही अडचण टाळण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत.

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा काढण्यात येत आहेत. या सुविधेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, याद्वारे एका दिवसातला नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचाः ७/१२चा उतारा हा शब्द कुठून आला? वाचा संपूर्ण माहिती)

असा मिळवा सातबारा

जमाबंदी आयुक्तालयातर्फे स्वाक्षरीयुक्त ऑनलाईन सातबारा, आठ-अ उतारे आणि मिळतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पैसे भरुन आणि योग्य ती माहिती भरुन डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ-अ उतारे आणि मिळतपत्रिका डाऊनलोड करता येतील. सरकारी कामकाजासाठी हे उतारे ग्राह्य धरण्यात येत आहेत. तर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर डिजीटल स्वाक्षरी नसलेल्या उता-यांची माहिती देण्यात येत आहे. सातबारा उतारे मिळवण्यासाठीची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद असल्यामुळे नागरिकांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे.

(हेही वाचाः जुगारासाठी चक्क महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा वापर!)

एका दिवसातला विक्रम

ई-फेरफार अंतर्गत आतापर्यंत केवळ डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि आठ-अ उतारेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण आता त्याद्वारे मिळतपत्रिका देखील मिळत आहे. 18 एप्रिलला एका दिवसात 87 हजार नागरिकांनी 1 लाख 2 हजार उतारे आणि उतारे आणि मिळतपत्रिका डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. राज्यातील एका दिवसातला हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 76 हजार 69 सातबारा, 18 हजार 526 आठ-अ उतारे आणि 5 हजार 617 मिळतपत्रिका आहेत. एका दिवसातील विक्रमामुळे शासनाला एकूण 20 लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.