Hindu Leaders : हिंदु नेते असुरक्षित !

हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर असलेले भीतीचे सावट नवे नाही. (Hindu Leaders) आतापर्यंत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील राज्यात हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांना जिहादी आतंकवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावे लागले आहे.

67
Hindu Leaders : हिंदु नेते असुरक्षित !
Hindu Leaders : हिंदु नेते असुरक्षित !

चेतन राजहंस

अलीगढ मधून अटक करण्यात आलेल्या ISIS च्या आतंकवाद्यांची चौकशी चालू आहे. हे आतंकवादी ISIS च्या पुणे मॉड्युलशी संबंधित आहेत. अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते या आतंकवाद्यांच्या रडारवर आहेत. हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर असलेले भीतीचे सावट नवे नाही. (Hindu Leaders) आतापर्यंत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील राज्यात हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांना जिहादी आतंकवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावे लागले आहे. हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या जीविताला असलेल्या धोक्याची काही ताजी उदाहरणे दिली आहेत.

New Project 46 4
चेतन राजहंस
पाकिस्तानमधून धमक्या

अमृतसर (पंजाब) येथील शिवसेनेचे नेते सुधीर सूरी (Sudhir Suri) यांच्या हत्येनंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये सामाजिक माध्यमांतून गोपाल चावला नावाच्या पाकमधील खलिस्तानवाद्याकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. यात तो म्हणाला, ‘शीख, मुसलमान आणि त्या प्रत्येक समाजाला, ज्याला स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा! मी त्याला सूरी नाही, तर डुक्कर म्हणेन. ज्या भावाने त्याला मारले, त्याचे मला कौतुक आहे. एक डुक्कर गेला आणि आता पुढच्यांचा क्रमांक आहे. निशांत शर्मा, अमित अरोडा (पंजाबमधील हिंदूंचे नेते) यांनाही जावे लागेल. ज्या प्रकारे सूरी मेला आहे, तसे अन्य लोकांना कुत्र्यांप्रमाणे मरायचे आहे.’

(हेही वाचा – Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय? )

खुलेआम हत्या आणि गल्लीबोळातून धमक्या

भाजप नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या कथित अवमानानंतर धर्मांधांकडून देशभर ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. देशभरात अनेक निष्पाप आणि निरपराध हिंदूंची खुलेआम हत्या करण्यात आली. त्यावेळी लक्ष्मणपुरी (उत्तर प्रदेश) राज्यातील सीतापूर जिल्ह्यात असलेल्या ‘बडी संगत’ संप्रदायाचे महंत बजरंग मुनी यांनाही भ्रमणभाषवरून ‘सर तन से जुदा’ची धमकी देण्यात आली होती. व्हाॅट्सअ‍ॅपद्वारे हा संपर्क करण्यात आला होता. धमकी देणा-याचे नाव हे मौलाना मुश्ताक खान होते. अशा प्रकारे अनेक नेते, कार्यकर्ते यांना धमक्या देण्यात आल्या.

हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांचे दमन

वर्ष २०२२ मध्ये देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा चालू असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त हर्ष या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. हर्ष यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस.डी.पी.आय., Social Democratic Party of India) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ.आय., Popular Front of India) या कट्टर इस्लामी संघटनांचा हात आहे. यामध्ये ६ धर्मांधांना अटक करण्यात आली.

(हेही वाचा – पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणातील आरोपी कोणते वापरायचे कोडवर्ड?)

धर्मांध महिलेकडून आमदारांना धमकी

सध्या देशात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. अशात तेलंगणा येथे एक वेगळाच प्रकार घडला. येथे एम.आय.एम.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे घरोघरी जाऊन प्रचार करत होते. त्या वेळी एक धर्मांध महिला असदुद्दीन ओवैसी यांना उद्देशून म्‍हणाली, ‘हा (असदुद्दीन ओवैसी) वाघिणीचा मुलगा आहे. विरोधकांना संपवून टाका. सगळे जग तुमच्या पाठीमागे उभे आहे. राजासिंह (भाजपचे उमेदवार तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह, Rajasingh) याच्या विरोधात कुणाला तरी उभे करा. मला त्याच्या विरोधात उभे करा. मी त्याच्या हत्या करते.’

आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांकडून धमकी

नुकतेच पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. ते आतंकवादी ‘इसिस’चे आहेत. त्यांच्या रडारवर काही हिंदू नेते होते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील शिवशक्ती धाम मंदिराचे महंत नरसिंहानंद यांच्यासह इतर हिंदू नेतेही आहेत. अन्य नेत्यांची नावे एनआयएकडून उघड करण्यात आलेली नाहीत. या जिहाद्यांकडून एनआयएने एक पिस्तूल, पाच काडतूसं आणि काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जप्त केले आहेत. यावरून या धोक्याची तीव्रता लक्षात येऊ शकते. (Hindu Leaders)

(हेही वाचा – ISIS In India : ए.एम.यू.च्या उच्चशिक्षित दहशतवाद्यांचा ‘हा’ कट उधळला; यूपी एटीएसला इसिसच्या विरोधात मोठे यश)

सामान्य हिंदूंचे हितरक्षण करणाऱ्या हिंदू नेत्यांच्या हत्या करून देशात हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तथाकथित मानवाधिकारवाले हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून आहेत. ‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीपणाच्या) नावाखाली हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. दुर्दैव म्हणजे इतके अत्याचार सहन करून जे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अक्षरशः प्राण तळहातावर घेऊन काम करत आहेत, त्यांच्या जीवाचे मोल एका बातमीएवढे आहे. या हत्यांच्या मालिकेची ना सरकार दखल घेते, ना कुठे आवाज उठवला जातो. तरीही हिंदूंनाच असहिष्णू म्हणून हिणवले जाते, हे दुर्दैव आहे!

भारताचे संविधान भारतीय जनतेच्या रक्षणासाठी बनलेले आहे. साम्यवादी, पुरोगामी यांच्यासाठी आपल्या यंत्रणा तत्परतेने काम करत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्याप्रमाणे हिंदू नेत्यांचे संरक्षण करण्याचे दायित्वही पोलीस आणि प्रशासन यांचेच आहे. हिंदू नेत्यांना न्याय देण्यासाठी न्याययंत्रणेकडूनही अपेक्षा आहेत. त्यामुळे हे हत्यांचे लोण थांबवण्यासाठी पोलीस, प्रशासन, न्यायपालिका यांनी आता तरी कठोर पावले उचलली पाहिजेत. (Hindu Leaders)

(लेखक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.