JNU : जेएनयूमध्ये उफाळला हिंदुद्वेष; पुन्हा बाबरी उभारण्याच्या घोषणा

JNU : जेएनयूच्या भाषा अभ्यास केंद्राच्या भिंतींवर 'बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येईल', अशा विखारी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यापुढे ६ डिसेंबर ही बाबरी ढाचा पाडल्याची तारीखही लिहिली होती.

454
JNU : जेएनयूमध्ये उफाळला हिंदुद्वेष; पुन्हा बाबरी उभारण्याच्या घोषणा
JNU : जेएनयूमध्ये उफाळला हिंदुद्वेष; पुन्हा बाबरी उभारण्याच्या घोषणा

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएनयू) पुन्हा एकदा हिंदूविरोध उफाळून आला आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापना (Rammandir Pran Pratishtha) सोहळ्याची तयारी देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशा स्थितीत जेएनयूच्या (JNU) भिंतींवर राममंदिराच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – BMC : हवेतील धुलिकण नियंत्रणासाठी २५ मोबाईल मिस्टींग वाहने भाडेतत्वावर; पाच वाहने कार्यरत)

जेएनयूच्या (JNU) भाषा अभ्यास केंद्राच्या भिंतींवर ‘बाबरी (Babari) मशीद पुन्हा बांधण्यात येईल’, अशा विखारी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यापुढे ६ डिसेंबर ही बाबरी ढाचा पाडल्याची तारीखही लिहिली होती.

या घोषणांच्या पुढे NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) असे लिहिण्यात आले आहे. मात्र एनएसयुआयने या घटनेचे दायित्व नाकारले आहे.

(हेही वाचा – BMC : चर बुजवण्यासाठी आणखी वाढला २४ कोटींचा खर्च)

अयोध्येतील (Ayodhya) राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी (Pranapratistha ceremonies in Ram Mandir) संपूर्ण देशात उत्साह असतांना या घोषणा लिहिण्यात आल्याने जेएनयूमध्ये अजूनही हिंदूविरोधी आणि देशविरोधी वातावरण आहे, हेच दिसून आले आहे.

यापूर्वीही जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या आहेत. ‘काश्मीर तेरे तुकडे होंगे’ या घोषणांचा व्हिडिओ समोर आल्यापासून सातत्याने हिंदूविरोध, देशविरोध दिसून येत आहे. (JNU)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.