BMC : हवेतील धुलिकण नियंत्रणासाठी २५ मोबाईल मिस्टींग वाहने भाडेतत्वावर; पाच वाहने कार्यरत

294
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व विभागांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, धुळीची समस्या दूर करण्यासाठी  आता ‘मोबाइल मिस्टिंग युनिट’ वाहने भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी दोन कंपन्यांकडून अनुक्रमे १३ आणि १२ वाहने भाडेतत्वावर घेतली जात असून पावसाळा आणि उन्हाळ्याचा मोसम वगळता या वाहनांची सेवा वर्षभरासाठी घेतली जात आहे. त्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या २५ वाहनांपैकी ५ वाहने प्राप्त झाली असून त्यानुसार ही सर्व वाहने कार्यरत आहेत, तसेच शनिवारपर्यंत आणखी ३ वाहने कार्यरत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हवेतील प्रदुषित धुलिकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक धोरणे तयार 

मागील नोव्हेंबर महिन्यापासून हवेतील प्रदुषित घटकांचे प्रमाण वाढत असून प्रदुषित हवेतील घटकांवर नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.  हवेतील या वाढत्या प्रदुषणामुळे याचा परिणाम मानव, प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण निसर्गावर दिसून येतो. आरोग्यास हानिकारक असलेल्या मुख्य प्रदुषकांमध्ये सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड  यांचा समावेश असतो.  त्यामुळे हवेतील प्रदुषित धुलिकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक धोरणे तयार करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका (BMC) आयुक्तांनी हवेतील हे प्रदुषण रोखण्यासाठी यंत्रे खरेदी करून तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. परंतु  या यंत्रांच्या खरेदीच्या प्रक्रियेला विलंब होणार असल्याने मुंबईसाठी २५ धुळ शमन यंत्रे अर्थात मोबाईल मिस्टींग वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा Madarasa : मराठी शाळा पडतायेत बंद सरकार मात्र मदरशांवर करतंय लाखो रुपयांचा खर्च)

पावसाळ्यात याची आवश्यकता नसली तरी उन्हाळ्यात याची आवश्यकता

ही वाहने दोन संस्थांकडून भाडेतत्वावर घेतली जाणार आहे. यासाठी एम एस एंटरप्रायझेस यांच्याकडून १३ वाहने तर एम आय ट्रेंडींग अँड जनरल सप्लायर्स या संस्थेकडून १२ वाहने अशाप्रकारे एकूण २५ मोबाईल मिस्टिंग वाहने भाडेतत्वावर घेतली जात आहेत. या  दोन्ही संस्थांना अनुक्रमे ९५१६ आणि ८७८४ पाळ्यांमध्ये ही सेवा घेतली जाणार आहे. या प्रति पाळीसाठी दोन्ही संस्थांना ३२८० रुपये मोजले जाणार आहे. मात्र, एकूण ३६६ दिवसांसाठी या संस्थांची निवड करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात यांची सेवा घेतली जाणार नाही. पावसाळ्यात याची आवश्यकता नसली तरी उन्हाळ्यात याची आवश्यकता असते. परंतु अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कडक उन्हाळ्यात धुलिकण हे उंचीवर असल्याने त्याचा परिणाम मनुष्यांवर होत नाही. या उलट हिवाळ्यात हे धुलिकण खाली कमी उंचीवर राहतात. त्यामुळे याचा परिणाम बराच जाणवतो. त्यामुळे या वाहनांची सेवा ३१ मार्चपर्यंत घ्यावी लागेल. परंतु होळीनंतर ही सेवा घेण्याची आवश्यकता भासत नाही, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.