NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल

एनआयएला तपासात अटकेत असलेल्या संशयित दहशतवादयांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि त्यांच्याकडून भारतात इसिस विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सक्रिय असलेल्या एका जटिल नेटवर्कचा सहभाग असलेल्या मोठ्या कटाचे पुरावे मिळून आले आहेत.

148
NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल
NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने महाराष्ट्र (इसिस) दहशतवादी-मॉड्यूल प्रकरणात सहा संशयित दहशतवाद्यांविरुद्ध गुरुवारी (२८ डिसेंबर) एनआयए (NIA) विशेष न्यायालयात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएला (NIA) तपासात अटकेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि त्यांच्याकडून भारतात इसिस (ISIS) विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सक्रिय असलेल्या एका जटिल नेटवर्कचा सहभाग असलेल्या मोठ्या कटाचे पुरावे मिळून आले आहेत. मुंबईतील ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ ​​लालाभाई बोरिवली-पडघा येथील शरजील शेख आणि आकीफ अतीक नाचन आणि जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ ​​अबू नुसैबा आणि पुण्यातील अदनानली सरकार यांच्या नावाचा आरोप पत्रात उल्लेख आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या सहा संशयिताविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांतर्गत या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (NIA)

लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याचा कट

अटकेत असलेले संशयित दहशतवादी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया'(ISIS)च्या हिंसक आणि दहशतवादी विचारसरणीचा सक्रियपणे प्रचारात गुंतलेले होते, तसेच संघटनेत व्यक्तींची भर्ती करून दहशतवादी हिंसेची पूर्वतयारी कृत्ये करत आहेत असे एनआयएच्या (NIA) तपासात समोर आले. अटकेत असलेले सहाही आरोपी हे सर्व प्रतिबंधित आयएसआयएस संघटनेचे (ISIS organization) सदस्य आहेत आणि त्यांनी लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याच्या आणि भारताची सुरक्षा, तिची धर्मनिरपेक्ष आचारसंहिता आणि संस्कृती आणि लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने या संघटनेच्या दहशतवादी कारवायांना पुढे नेण्याचा कट रचला होता असे एनआयए (NIA) प्रवक्त्याने सांगितले. (NIA)

(हेही वाचा – BMC : चर बुजवण्यासाठी आणखी वाढला २४ कोटींचा खर्च)

दोषी साहित्य देखील जप्त

एनआयएने (NIA) महाराष्ट्रात टाकलेल्या अनेक छाप्यांमध्ये जुलैमध्ये आरोपींना अटक करण्यात आली होती. विशेष एनआयए न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या ४०० पानांच्या आरोपपत्रात १५ साक्षीदार आहेत. एनआयएने आरोपींकडून “हिजराह” (सिरियामध्ये स्थलांतर) संबंधित दोषी साहित्य देखील जप्त केले. त्यात इसिसने (ISIS) प्रकाशित केलेली “व्हॉईस ऑफ हिंद” आणि “व्हॉईस ऑफ खुरासान” सारखी प्रोपगंडा मासिके देखील सापडली. पुढे, आरोपी त्यांच्या संपर्कांत राहण्यासाठी ‘डीआयवाय’ (DIY) (डू इट युवरसेल्फ) किट शेअर करत होते. आरोपी त्यांच्या दहशतवादी योजना आणि डिझाईन्सला वित्तपुरवठा करण्यासाठी निधी उभारत असल्याचेही आढळून आले आहे,” अधिकाऱ्याने पुढे सांगितले. (NIA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.