Road Accident :अपघाती मृत्यूमध्ये महाराष्ट्र तिसरा, चार वर्षांच्या तुलनेत २०२२ मध्ये ‘इतकी’ वाढ

48

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू होत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेल्या २०२२ च्या अहवालातून स्पष्ट होत आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रस्ते वाहन अपघात राष्ट्रीय महामार्गांवर झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अपघातासाठी सहाव्या; तर अपघाती मृत्यूसाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे.देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात होतात. राज्यात दरवर्षी जवळपास १५ हजार व्यक्ती रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. गेल्या वर्षांच्या तुलनेत मृत्युदरात ८.१ टक्‍के वाढ झाली असल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते वाहन अपघात चिंतेचा विषय ठरला आहे. (Road Accident)

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आपल्या अहवालात अपघात आणि मृत्यूच्या वाढत्या संख्येचे वर्गीकरण केले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक संख्‍या असलेल्‍या देशातील १० राज्‍यांना निवडण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक अपघात तमिळनाडूमध्ये झाले आहे. त्यानंतर केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आहे.धक्कादायक म्हणजे २०१८ नंतर पहिल्यांदा २०२२ मध्ये अपघातात ६.२ टक्के वाढ झाली असून, ९ हजार ४१७ अपघात झाले असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे; तर वाहन अपघातामध्ये ४ हजार ९२३ मृत्यू झाले असून, गेल्या वर्षांच्या तुलनेत मृत्युदरात ८.१ टक्‍के वाढ झाली असल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते वाहन अपघात चिंतेचा विषय ठरला आहे.वाहनांच्या वेग मर्यादेबद्दल केंद्राकडून निर्णय होतील. प्रत्येक रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करण्यचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याची अंमलबजावणी सुरु आहे.

(हेही वाचा : Samajwadi Party VS Congress : उत्तरप्रदेशात कॉंग्रेस विरुद्ध सपा; ‘इंडी’ आघाडीचा होणार खेळ खंडोबा)

सर्वाधिक अपघात
राज्य – २०१८ – २०१९- २०२०- २०२१ – २०२१ – टक्केवारी
तमिळनाडू – २२,९६१ – २१,४८९ – १८,३७२ – १६,८६९ – १८,९७२ – १२.५ टक्के
केरळ – ९,१६१ – ९,४५९ – ६,५९४ – ८,०४८ – १७,६२७ – ११.६ टक्के
सर्वाधिक मृत्‍यू
राज्य – २०१८ – २०१९- २०२०- २०२१ – २०२१ – टक्केवारी
उत्तर प्रदेश – ८,८१८ – ८,८३० – ७,८५९ – ८,५०६ – ८,४७९ – १३.९ टक्के
तामीळनाडू – ६,७५६ – ६,६६१ – ५,४५४ – ५,२६३ – ५,९७८ – ९.८ टक्के
महाराष्ट्र – ४,०८८ – ३,७०९ – ३,५२८ – ४,०८० – ४,९२३ – ८.१ टक्के
उत्तर प्रदेश – १६,१९८ – १६,१८१ – १३,६९५ – १४,५४० – १४,९९० – ९.९ टक्के
मध्य प्रदेश – ९,९६७ – १०,४४० – ९,८६६ – ११,०३० – १३,८६० – ९.१ टक्के
कर्नाटक – १३,६३८ – १,३३६३ – ११,२३० – ११,४६२ – १३,३८४ – ८.८ टक्के
महाराष्ट्र – ९,३५५ – ८,३६० – ६,५०१ – ७,५०१ – ९,४१७ – ६.२ टक्के
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.