Samajwadi Party VS Congress : राजस्थानात कॉंग्रेस विरुद्ध सपा; ‘इंडी’ आघाडीचा होणार खेळ खंडोबा

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला पराभूत करण्याचा विडा उचलला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

130
Samajwadi Party

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला पराभूत करण्याचा विडा उचलला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत यादव कॉंग्रेसच्या उमेदवारांविरूध्द मोठ्या प्रमाणावर आपले उमेदवार उभे करताना दिसत आहेत. (Samajwadi Party VS Congress)

सविस्तर वृत्त असे की, ‘इंडी’ आघाडतील घटक पक्ष कॉंग्रेस आणि सपा एकमेकांना पराभूत करण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. कॉंग्रेसने शब्द दिल्यानंतरही मध्यप्रदेशात समाजवादी पक्षासाठी जागा सोडल्या नाही. यामुळे नाराज अखिलेश यादव यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षाचे उमेदवार उतरविले आहेत. (Samajwadi Party VS Congress)

सपाने मध्यप्रदेशात कॉंग्रेसच्या ७४ उमेदवारांविरूध्द आपले उमेदवार उतरविले आहेत. आता राजस्थानमध्ये सुध्दा सपाने कॉंग्रेसला पाणी पाजण्याचे ठरविले आहे. सपाने येथे आतापर्यंत कॉंग्रेसच्या विरोधात पाच उमेदवार उतरविले आहेत. यात अलवर जिल्ह्यातील राजगड, लक्ष्मणगड आणि थानागाजीचा समावेश आहे. याशिवाय धौलपूर जिल्ह्यातील धौलपूर आणि नदबई या मतदारसंघाचा समावेश आहे. सपाने २०१८ मध्ये सुध्दा येथे उमेदवार उतरविले होते. परंतु सर्वच ठिकाणी सपाचा पराभव झाला होता. (Samajwadi Party VS Congress)

(हेही वाचा – Governor Nominated MLC : ‘त्या’ याचिकेची सुनावणी आता ७ डिसेंबरपर्यंत तहकूब)

कॉंग्रेसने शब्द मोडल्यामुळे अखिलेश यादव यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आहे. आता ते कॉंग्रेसचा समाचार घेताना जराही मागेपुढे बघत नाही असे दिसून येत आहे. यादव यांच्या एका विधानाने सपा कॉंग्रेसला सोडून भाजपच्या जवळ जात आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. यादव म्हणाले की, ‘भाजप आता तेच करीत आहे जे कॉंग्रेसने सत्तेत असताना केले होते. कॉंग्रेसने सुध्दा अन्य पक्षांना दबावात ठेवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला होता’. (Samajwadi Party VS Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.