Monsoon Update : दोन दिवस सलग कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे वेधशाळेकडून देखील हवामानासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

63
Monsoon Update : दोन दिवस सलग कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
Monsoon Update : दोन दिवस सलग कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील पावसाबाबत अंदाज जारी केला आहे. पुणे वेधशाळेकडून देखील हवामाना संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गोवा पासून ११०, रत्नागिरी पासून १३० किमी अंतरावर याचा प्रभाव आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update)

भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील पावसाबाबत अंदाज जारी केला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण गोवा किनारपट्टी पार करण्याची शक्यता आहे.याक्षेत्राच्या प्रभावामुळं कोकण गोव्यात ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असेल. या वातावरणाचा परिणाम पुण्यातील वातावरणावर देखील होणार असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा : Harbour Railway : आणखी पाच दिवसांचा रात्रकालीन मेगाब्लॉक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.