Heavy Rain : हिमाचल आणि उत्तराखंडला ‘रेड-अलर्ट’; सततच्या पावसामुळे ६६ जणांचा मृत्यू

79
Heavy Rain : हिमाचल आणि उत्तराखंडला 'रेड-अलर्ट'; सततच्या पावसामुळे ६६ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सततचा मुसळधार (Heavy Rain) पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत जखमींना वाचवण्याचे आणि ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अविरत सुरु आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रंचड (Heavy Rain) पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच हवामान विभागाने या दोन्ही राज्यांना ‘रेड-अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार आज, गुरुवार १७ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा – BJP vs Shiv sena :कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजप समर्थक भिडले; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण)

याशिवाय बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशात १३ ऑगस्टपासून मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) सर्वाधिक मृत्यू हिमाचल मध्ये झाले असून यात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबतची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.