MNS Activists : मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

76
MNS Activists : मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

इतर सर्व पक्षांप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS Activists) देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार १६ ऑगस्ट रोजी पनवेल मध्ये मनसेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर रस्ते अपघात, रस्त्यांवरील खड्डे, मुंबई गोवा महामार्ग इत्यादी विषयांवरून सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या भाषणानंतर माणसे कार्यकर्ते (MNS Activists) आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली.

(हेही वाचा – Dombivli to Kargil Journey : रोहितचा जवानांना राख्या पोहचविण्यासाठी डोंबिवली ते कारगिल दुचाकीवरून प्रवास)

नेमकी घटना काय?

मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर मनसेने (MNS Activists) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं (MNS Activists) साम्राज्य पसरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Activists) यांनी पनवेलमध्ये महामार्गाची पाहाणी केली त्यानंतर पनवेलमधील कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु करण्याचं आव्हान केलं. असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना आपल्या आंदोलनाची भीती वाटली पाहिजे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आक्रमक झाले आहेत. माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव येथील चेतक सन्नी कंपनीच्या कार्यालयात राडा घातला.

पनवेलमध्ये राज ठाकरे यांच्या मेळाव्यावरुन परतताना मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Activists) माणगावमध्ये तोडफोड सुरु केली. कार्यालयातील खूर्च्या आणि फर्निचरची तोडफोड करत कार्यकर्त्यांनी मनसेच्या घोषणा दिल्या. या घटनेनंतर कार्यालयाबाहेर पोलस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवात महागार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मनसेकडून (MNS Activists) यावेळी देण्यात आला.

हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.