Heavy Rain : देशातील ‘या’ सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

बुधवार २४ मे पासून देशातील अनेक भागांत तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून देशातल्या अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

114
Heavy Rain
Heavy Rain : देशातील 'या' सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील सहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५२४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर)

बुधवार २४ मे पासून देशातील अनेक भागांत तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून देशातल्या अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘या’ राज्यांना यल्लो अलर्टचा इशारा

देशातल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि गारपीट होऊ शकते. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने अनेक भागांमध्ये यल्लो अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ आर. के. जेनामणी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस डोंगराळ भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच पूर्व भारतात जोरदार वादळाची (Heavy Rain) शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.