Alert: ‘या’ बॅंकेने दिला ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा

116

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांना लाखो रुपयांचा चुना लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी SBI ने ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आता या बॅंकेच्या पाठोपाठ HDFC ने आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

PAN Card ची माहिती अपडेट करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये. सध्या पॅन कार्ड नंबर अपडेट करण्याच्या नावाखाली अनेक बनावट SMS येत असून, फसवणुकीची शक्यता आहे.

बॅंक एसएमएस किंवा काॅलद्वारे गोपनीय माहिती शेअर करण्यास कधीही सांगत नाही. वैयक्तिक खात्याचे तपशील शेअर करत नुकसान करुन घेऊ नका, असा सल्ला बॅंकेने ग्राहकांना दिला आहे.

( हेही वाचा: Employment India: 10 लाख सरकारी पदांसाठी भरती; पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.