Haldwani violence : मुख्य आरोपी अब्दुल मलिकविरोधात लुकआऊट नोटीस जारी; आतापर्यंत ४२ जणांना अटक

एक बेकायदेशीर मदरसा आणि नमाज पठणस्थळ पाडल्याबद्दल झालेल्या हिंसाचारानंतर ८ फेब्रुवारी रोजी हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. हिंसाचारानंतर सात दिवसांनी हल्द्वानी प्रशासनाने म्हणजेच गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी बनभुलपुरा शहरातील संचारबंदी काही तासांसाठी शिथिल केली.

195
Haldwani violence : मुख्य आरोपी अब्दुल मलिकविरोधात लुकआऊट नोटीस जारी; आतापर्यंत ४२ जणांना अटक

उत्तराखंडमधील हल्द्वानी (Haldwani violence) येथील बनभुलपुरा भागात १५ फेब्रुवारी रोजी उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यासह, अटक केलेल्या गुंडांची एकूण संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. २२ वर्षीय मोहम्मद इस्तकर ऊर्फ जब्बा, २९ वर्षीय शरीफ ऊर्फ पाचा, २१ वर्षीय आदि खान, ३० वर्षीय मोहम्मद आसिफ आणि ३३ वर्षीय हुकुम रझा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईद या हिंसाचारातील मुख्य आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

(हेही वाचा – Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल)

हल्लेखोरांनी दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले –

८ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी (Haldwani violence) येथे अतिक्रमण हटवत असताना बनभुलपुरातील काही गुंडांनी जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, पत्रकार यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी दगडफेक, पेट्रोल बॉम्ब, लाठीमार केला आणि बेकायदेशीर शस्त्रांनी गोळीबार केला. त्यानंतर प्रशासनाने हल्द्वानीमध्ये संचारबंदी लागू केली होती आणि गुंडांना ‘गोळ्या घालण्याचे’ आदेश दिले होते. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४२ जणांना अटक केली आहे. (Haldwani violence)

(हेही वाचा – London AI Center : लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार; लॉर्ड मेयर ऑफ लंडन यांचा मानस)

काही तासांसाठी संचारबंदी शिथिल –

एक बेकायदेशीर मदरसा (Haldwani violence) आणि नमाज पठणस्थळ पाडल्याबद्दल झालेल्या हिंसाचारानंतर ८ फेब्रुवारी रोजी हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. हिंसाचारानंतर सात दिवसांनी हल्द्वानी प्रशासनाने म्हणजेच गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी बनभुलपुरा शहरातील संचारबंदी काही तासांसाठी शिथिल केली. नैनीतालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंग यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, गुवाहाटी, रेल्वे बाजार आणि एफसीआय गोदाम परिसरात सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली. (Haldwani violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.