JNPT Port Corruption Case : सीबीआयकडून गुन्हे दाखल; १८ सीमाशुल्क अधिकाऱ्यांसह २४ जणांचा समावेश

सीबीआयने दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे दोन सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आयात-निर्यातीला ९.५ कोटी रुपयांच्या बनावट ड्युटी ड्रॉबॅकसाठी मदत केली, असा सीबीआयचा दावा आहे. तिसऱ्या प्रकरणात, या सिंडिकेटचा तपास करणाऱ्या एका कस्टम अधिकाऱ्याने व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच घेतली होती.

236
JNPT Port Corruption Case : सीबीआयकडून गुन्हे दाखल; १८ सीमाशुल्क अधिकाऱ्यांसह २४ जणांचा समावेश

शिवडी-न्हावाशेवा बंदरातील एक मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. बोगस शिपिंग बिले तयार करून कोट्यवधी रुपयांचे निर्यात शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तीन वेगवेगळ्या प्रकरणात २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, या गुन्ह्यात १८ सीमाशुल्क अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (JNPT Port Corruption Case)

सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे दोन सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आयात-निर्यातीला ९.५ कोटी रुपयांच्या बनावट ड्युटी ड्रॉबॅकसाठी मदत केली, असा सीबीआयचा (CBI) दावा आहे. तिसऱ्या प्रकरणात, या सिंडिकेटचा तपास करणाऱ्या एका कस्टम अधिकाऱ्याने व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच घेतली होती. सीबीआयने (CBI) बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, गोवा आणि जम्मूमध्ये २४ ठिकाणी छापे टाकले. या आठवड्याच्या सुरुवातीलाच गुन्हे नोंदवण्यात आले आहे. (JNPT Port Corruption Case)

(हेही वाचा – London AI Center : लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार; लॉर्ड मेयर ऑफ लंडन यांचा मानस)

असा आला गुन्हा समोर 

हे प्रकरण २०१७ मधील असून सीमा शुल्क अधीक्षक आणि प्रतिबंधात्मक अधिकारी एकमेकांशी आणि आरोपी व्यावसायिकांसोबत गुन्हेगारी कट रचला असे सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. व्यापाऱ्यांनी मालाच्या निर्यात आणि आयातीसाठी ९३ बनावट शिपिंग बिले दाखल केली होती आणि सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी खात्री न करता मालाची वास्तविक कागदपत्रे/कंटेनरची तपासणी करण्यात आलेली नव्हती असे सीबीआयने (CBI) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. (JNPT Port Corruption Case)

तिसऱ्या गुन्ह्यात, सीबीआयने (CBI) सांगितले की, प्रतिबंधात्मक कक्षामधील एका निरीक्षकाला काही प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणि निर्यात गैरवापराशी संबंधित गुप्त माहिती गोळा करण्यासाठी नेमण्यात आले होते. बोगस शिपिंग बिलांच्या आधारे एका सिंडिकेटने ड्युटी ड्रॉबॅकचा खोटा दावा केल्याची माहिती निरीक्षकाला समजली. ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ पासून, निरीक्षकाने या सिंडिकेटचा मुख्य असलेल्या एका व्यावसायिकासोबत गुन्हेगारी कट रचून निरीक्षकाने सुरुवातीला व्यावसायिकाकडून १ कोटी रुपयांची लाच मागितली आणि नंतर सिंडिकेटवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक बोगस बिलामागे दहा हजार रुपये या अटीवर २५ लाख रुपये स्वीकारले, सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. (JNPT Port Corruption Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.