Cash for query : महुआ मोईत्रा यांना EDचे समन्स; 19 फेब्रुवारीला होणार चौकशी

Cash for query : महुआ मोईत्रा यांना 19 फेब्रुवारीला यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या संसदेच्या आचार समितीने लोकसभेत महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई केली होती.

143
Cash for query : महुआ मोईत्रा यांना EDचे समन्स; 19 फेब्रुवारीला होणार चौकशी
Cash for query : महुआ मोईत्रा यांना EDचे समन्स; 19 फेब्रुवारीला होणार चौकशी

कॅश फॉर क्वेरी म्हणजेच पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. (Cash for query)

महुआ मोईत्रा यांना 19 फेब्रुवारीला यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या संसदेच्या आचार समितीने लोकसभेत महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई केली होती. याच प्रकरणात मोईत्रा यांना खासदारकीही गमवावी लागली आहे.

(हेही वाचा – JNPT Port Corruption Case : सीबीआयकडून गुन्हे दाखल; १८ सीमाशुल्क अधिकाऱ्यांसह २४ जणांचा समावेश)

महुआ मोइत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी (Darshan Hiranandani) यांच्या सांगण्यावरून संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. तसेच मोईत्रा यांच्याविरोधात तक्रारही केली होती.

कॅश फॉर क्वेरी प्रकरण काय आहे ?

या प्रकरणी निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात मोईत्रा यांनी संसदेत विचारलेल्या एकूण 61 प्रश्नांपैकी जवळपास 50 प्रश्न दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी विचारले होते, असा आरोप करण्यात आला होता. दुबे यांना महुआ यांचे माजी मित्र जय अनंत यांचे एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये त्यांनी मोईत्रा आणि प्रसिद्ध उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाचेच्या देवाणघेवाणीवर प्रश्न उपस्थित केला होता. उद्योगपती हिरानंदानी यांनी मोईत्रा यांच्या ‘लॉगिन आयडी’चा वापर दुबईतून प्रश्न विचारण्यासाठी केला, असाही आरोप मोईत्रा यांच्यावर आहे.

महुआ मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले खोटे असल्याचे सांगितले. लोकसभा अध्यक्षांनी हे संपूर्ण प्रकरण आचार समितीकडे पाठवले आहे. मात्र निशिकांत दुबे यांनीही या प्रकरणी लोकपालमध्येही तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. (Cash for query)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.