Gudi Padwa 2024 : कुर्ला येथे नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात संपन्न

कुर्ला पश्चिम येथे भारत सिनेमा येथे देशातील १२ प्रमुख मंदिरांवर आधारित देखावा सादर करण्यात आला होता. मध्यभागी असलेल्या विशालकाय अशा नंदी आणि शंकराची पिंड यांच्याकडे सर्वांच लक्ष्य वेधलं जात होतं.

108
Gudi Padwa 2024 : कुर्ला येथे नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात संपन्न

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (प.) तर्फे गेल्या १५ वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी “मंदिरे हीच राष्ट्रमंदिरे” या संकल्पनेअंतर्गत देशातील १२ मोठ्या मंदिरांची महती सर्वांसमोर ठेवण्यात आली. श्री सर्वेश्वर मंदिर, गौरीशंकर मंदिर, जयभवानी चौक, शिक्षक नगर या ४ ठिकाणाहून सकाळी ११.०० वाजता मिरवणूकांना सुरुवात झाली. यात्रेमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता, विठ्ठल रखुमाई, जगन्नाथ मंदिर आधी चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच लहान मुलींचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला, कोळीनृत्य, नाशिक ढोल पथक, पुणेरी ढोल पथक यांनी प्रात्यक्षिके सादर केली. (Gudi Padwa 2024)

(हेही वाचा – BMC : अखेर महापालिका आयुक्त दोन्ही अतिरिक्त आयुक्तांसह उतरले रस्त्यावर)

विशालकाय अशा नंदी आणि शंकराच्या पिंडीने वेधले लक्ष

कुर्ला पश्चिम येथे भारत सिनेमा येथे देशातील १२ प्रमुख मंदिरांवर आधारित देखावा सादर करण्यात आला होता. मध्यभागी असलेल्या विशालकाय अशा नंदी आणि शंकराची पिंड यांच्याकडे सर्वांच लक्ष्य वेधलं जात होतं. तसेच ५१ लहान मुली देवीच्या वेषात उपस्थित होत्या व देवीची ५१ शक्तिपीठे सादर करण्यात आली. नंतर चारही यात्रा एकत्र येऊन जागृत विनायक मंदिर येथे आरती होऊन यात्रेची सांगता झाली. (Gudi Padwa 2024)

यावेळी खासदार पूनम महाजन, कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, मनोज नाथानी, किरण दामले, अरविंद कोठारी, मंगल नायकवडी, आशिष पटवा, प्रकाश चौधरी, योगेश आरडे, कपिल यादव, गजानन मनगुटकर, नवनाथ शिंदे,राकेश भुवड, जोतिबा मनगुटकर उपस्थित होते. (Gudi Padwa 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.