Gold Rate : सोन्याचे दर खरंच १ लाखांपर्यंत जातील का?

Gold Rate : इस्रायल-इराण युद्धामुळे सोन्याचे दर पुन्हा चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

199
Gold Rate : सोन्याचे दर खरंच १ लाखांपर्यंत जातील का?
  • ऋजुता लुकतुके

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव (Gold Rate) सातत्याने वाढतोय. मंगळवारी सोनं प्रतितोळा (१० ग्रॅम) ७४,५९० हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. सध्या लग्नसराई चालू आहे. लोक या काळात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र सोन्याच्या या भाववाढीमुळे सध्या सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय. आगामी काळात हेच सोनं आणखी भाव खाण्याची शक्यता आहे. सोन्यासह चांदी या धातूचीही हीच स्थिती आहे. चांदीचा दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असून चांदीचा दर सध्या ८३,८१९ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. (Gold Rate)

राष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थिती काय?

तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या जागतिक पातळीवर घडत असलेल्या घटनांमुळे सध्यातरी सोन्याचे दर (Gold Rate) कमी होण्याची शक्यता नाही. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धामुळेदेखील सोने-चांदीचा भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर संघटना गोल्डमॅन सॅक्स या संस्थेच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात सोन्याचा भाव या वर्षाच्या शेवटपर्यंत २,७०० डॉलर प्रति औंस पर्यंत वाढू शकतो. काही दिवसांपर्वी हाच दर २,३०० डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सोन्याच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या अन्य काही संस्था तर हाच दर ३००० डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगतायत. (Gold Rate)

(हेही वाचा – Shri Shahu Chhatrapati : श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडे किती कोटींची संपत्ती?)

सोने-चांदीचा दर ऑल टाईम हाय!

फेब्रुवारी महिन्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळाली आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर (Gold Rate) हा २,४२४.३२ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चारपट वाढ झाली होती. सध्या जागतिक बाजाराता सोन्याचा दर हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर (All Time High) आहे. चांदीच्या दरातही चार पटीने वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर हा २९.६० डॉलर प्रति औंस झाला असून तो २०२१ सालानंतरचा सर्वाधिक दर आहे. (Gold Rate)

सोन्याचा भाव एक लाख होणार?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या देशात सोन्याचा भाव (Gold Rate) हा ७३,००० रुपये प्रति १० ग्रॅमपेक्षा जास्त झाला आहे. चांदीचा भावदेखील ८३ हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा अधिक झाला आहे. इस्रायल-इराण युद्धाची स्थिती तसेच अन्य जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात अशीच स्थिती राहिल्यास आगामी वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत सोन्याचा दर हा एक लाख रुपये प्रति १० ग्रॅम होऊ शकतो. सोन्यासह चांदीचा दरदेखील एक लाख रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. (Gold Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.