Rohingya Muslim : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांनी 1600 हिंदूंना ठेवले ओलिस; लष्करच रोहिंग्यांना देत आहेत मोकळीक 

म्यानमार आर्मीने अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी (एआरएसए) आणि अराकान रोहिंग्या आर्मी (एआरए) यांना अराकान आर्मी (एए) विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे आणि लष्करी प्रशिक्षण दिले आहे.

308

रोहिंग्या मुस्लिमांनी (Rohingya Muslim) 2017 मध्ये म्यानमारमध्ये मोठ्या संख्येने हिंदू आणि बौद्धांची हत्या केली. आता इस्लामी दहशतवादी या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्यानमारच्या अराकान प्रांतात 1600 हून अधिक हिंदू आणि 120 बौद्ध समुदायाच्या लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. प्रकरण बुथिदुआंगचे आहे. परिसरात अराजकता आणि अस्थिरतेचे वातावरण आहे.

धर्माच्या आधारे नरसंहाराचा कट रचला 

‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करानेरोहिंग्यांना (Rohingya Muslim) देशातील स्थानिक समुदायांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम दिले आहे. धर्माच्या आधारे नरसंहाराचा कट रचला जात आहे. या क्रमाने 1600 हून अधिक हिंदू आणि 120 हून अधिक बौद्धांना ओलीस ठेवण्यात आले आहे. आता त्यांच्या सुटकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिसरात धार्मिक व जातीय दंगली होत असल्याने लोकांना जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

(हेही वाचा Iran Israel War : इस्राइलवरील हल्ल्यावर अमेरिका इराणच्या विरोधात घेणार कठोर भूमिका)

रोहिंग्या घरे जाळत आहेत

गुरुवारी, 11 एप्रिल 2024 रोजी दोन तरुणांचे मृतदेह सापडले, त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. म्यानमारचे सैन्य नोव्हेंबर 2023 पासून अराकान आर्मीशी लढत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. म्यानमार आर्मीने अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी (एआरएसए) आणि अराकान रोहिंग्या आर्मी (एआरए) यांना अराकान आर्मी (एए) विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे आणि लष्करी प्रशिक्षण दिले आहे. रोहिंग्या दहशतवादी केवळ घरेच लुटत नाहीत तर लोकांचे अपहरण करून त्यांची घरे जाळत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.