Goa Rain Update : गोवा दुबईच्या वाटेवर ; अवकाळी पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियात व्हिडीओंचा ‘पूर’ 

अवकाळी पावसामुळे ट्रॅफिक जाम, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण

232
Goa Rain Update : गोवा दुबईच्या वाटेवर ; अवकाळी पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियात व्हिडीओंचा ‘पूर’ 

गोव्यात शनिवारी सकाळी जोरदार (Goa Heavy Rain) अवकाळी पावसाळा सुरुवात झाली असून, उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे. (Goa Rain Update)

(हेही वाचा – Rahul Bhandarkar : राहुल भांडारकर यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान)

 

समुद्र खवळल्यामुळे मच्छिमारांनी पावसाच्या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा सल्ला ही देण्यात आला आहे. गोवा, तसेच महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकच्या (Karnatak) काही भागांत पावसाचे वातावरण तयार झाले असून या भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील तीन ते चार तास पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, असे अहवाल नमूद केले आहे.(Goa Rain Update) 

 

(हेही वाचा – Doping News : शालू चौधरीची उत्तेजक सेवनाच्या आरोपांतून मुक्तता, दीड लाखांची नुकसान भरपाईही मिळणार)

स्मार्ट सिटी पणजीमध्ये (Smart City Panji) काही दिवसांपासून पावसाचा अंदाज येत असून, मुसळधार पावसामुळे रस्ते खचू लागले आहेत. काही भागात, विशेषत: बांधकाम चालू असल्यामुळे येथे पायाभूत सुविधांचा नागरिकांना अभाव जावणू लागला आहे. मुसळधार पावसामुळे गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये (Goa Medical College) पाणी साचले असून उपचार संबंधी रुग्णांची हेळसांड होत आहे.  (Goa Rain Update)  

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.