Doping News : शालू चौधरीची उत्तेजक सेवनाच्या आरोपांतून मुक्तता, दीड लाखांची नुकसान भरपाईही मिळणार

Doping News : मध्यमपल्ल्याची धावपटू शालू चौधरीने उत्तेजक चाचणीविरुद्ध अपील केलं होतं. 

79
Doping News : शालू चौधरीची उत्तेजक सेवनाच्या आरोपांतून मुक्तता, दीड लाखांची नुकसान भरपाईही मिळणार
  • ऋजुता लुकतुके

भारताची मध्यम पल्ल्याची धावपटू शालू चौधरीचं (Shalu Chaudhary) उत्तेजक चाचणीविरोधातील अपील नाडाने उचलून धरलं आहे. आणि तिला ताबडतोब दोषमुक्त करण्यात आलं असून ४ वर्षांची बंदीही काढून घेण्यात आली आहे. तसंच तिला दीड लाख रुपयेही परत मिळणार आहेत. आधीच्या निर्णयाविरोधात शालूने अपील केल्यानंतर तिची डीएनए चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा निकाल पाहिल्यावर शालूच्या लघवीचा नमुना एकतर बदलण्यात आला असावा किंवा त्यात बाहेरून काहीतरी मिसळण्यात आलं असावं असा निष्कर्ष नाडाच्या समितीने काढला. (Doping News)

भारताची ३० वर्षीय ॲथलीट ८०० मीटरची शर्यत खेळते आणि बंदी विरोधात यापूर्वी तिने केलेलं अपील फेटाळण्यात आलं होतं. पण, शालूने (Shalu Chaudhary) पाठपुरावा सोडला नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यातही शालूने डीएनए चाचणीची विनंती केली होती. पण, सुरुवातीला ती फेटाळल्यावर नाडाच्या नवीन पॅनलने अखेर तिची विनंती मान्य केली. आणि तिच्या लघवीचा नमुना लंडनच्या किंग्ज कॉलेजला पाठवण्यात आला. (Doping News)

(हेही वाचा – IPL 2024 Suryakumar Yadav : क्रिकेटमधील चढ उतारांबद्दल सूर्यकुमार यादवला काय वाटतं?)

अखेर शालू चौधरीच्या लढ्याला आले यश 

तिथे डीएनएचे दोन अंश आढळले. त्यामुळे एकतर नमुना भेसळयुक्त होता. किंवा त्यात नंतर काहीतरी मिसळलं गेलं हे उघड होतं. त्यामुळे नाडाच्या पॅनलने किंग्ज कॉलेजचा अहवाल स्वीकारला. त्यानुसार उत्तेजक चाचणीवर आधारित जुना निकालही फिरवला. एप्रिल २०२३ पासून शालू चौधरी (Shalu Chaudhary) या विरोधात लढा देत होती. पण, अखेर तिला यश मिळालं आहे. त्यामुळे तिच्यावरील ४ वर्षांची बंदी हटवण्याबरोबरच एप्रिल २०२३ पासूनचे तिचे निकाल रद्द करण्याचा आदेशही आता मागे घेण्यात आला आहे. (Doping News)

डीएनए चाचण्या करून घेण्यासाठी शालू चौधरीला दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. तो तिला परत देण्याचे आदेशही नाडाने दिले आहेत. शालू (Shalu Chaudhary) सध्या निर्दोष सिद्ध झाली असली तरी त्यासाठी तिची दोन वर्षं खर्ची गेली आहेत. त्यामुळे तिचे प्रशिक्षक पार्थ गोस्वामी यांनी अशी अपील तातडीने निकालात काढण्याची विनंती केली आहे. (Doping News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.