Flag : ५० वर्षांपासून बाप-लेक झेंडे धुवून, इस्त्री करून देण्याचे करतात काम, दुसरी पिढी जपते देशसेवेची परंपरा

90

आपल्या देशाबद्दल प्रत्येकालाच प्रेम आहे. देशाबद्दलची राष्ट्रभावना कुणीही शब्दात व्यक्त करत नाही. ती प्रत्येकाच्याच मनात असते. देशाच्या सेवेसाठी सैनिक बॉर्डरवर चोवीस तास पाहरा देत आपल्या देशाची सेवा करतात. आपल्या तिरंग्याची शान आबाधित ठेवण्यासाठी वाट्टेल ते करायला ते तयार असतात. सैनिकांमुळेच आपल्या भारताचे नागरिक सुरक्षित आहेत. प्रत्येकजण आपली देशाप्रती असणारी भावना व्यक्त करत असतो. कुठल्या ना कुठल्या रूपाने तो देशाची सेवा करत असतो. मात्र पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या पिंपळगाव या गावातील एक चौसष्ट वर्षीय देशभक्त स्वतः तिरंगा धुवून, त्याला इस्त्री करून संपूर्ण गावातील शासकीय कार्यालये, शाळा, दूध डेअरी, बँक अशा अनेक ठिकाणी देण्याचे काम गेली ५० वर्षांपासून करतो आहे. त्यासाठी तो एक रुपया देखील मानधन घेत नाही. त्याच्या या अनोख्या देश सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यामध्ये त्यांची दोन्ही मुले देखील त्यांना साथ देत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे राहणारे शंकरराव पांडुरंग भागवत हे १९७२ पासून या गावात राहतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकांचे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. अवघे सातवी शिक्षण झालेल्या बाळासाहेब यांना देश सेवेची प्रचंड आवड. देशासाठी काय करता येईल हा विचार सतत त्यांच्या मनात घर करून होता. तेव्हा त्या काळात एक विचार त्यांच्या मनात येऊन गेला की, आपण आपल्या देशाचे प्रतीक असलेल्या तिरंगा झेंडा हा गावातील सर्व शासकीय वास्तुंवर फडकवतो. तो धुवून आणि इस्त्री करून द्यायचा. तेव्हापासून त्यांना ही सवय लागली. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी गावातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर शंकरराव भागवत यांनी इस्त्री करून दिलेला झेंडा फडकवला जातो. गेली ५० वर्ष ते ही सेवा अविरतपणे करत आहेत. किशोर भागवत आणि वैभव शंकर भागवत हे वडिलांच्या देशसेवेचे काम अविरतपणे करत आहेत.

(हेही वाचा I.N.D.I.A च्या महाराष्ट्रातील बैठकीआधीच ठाकरे गटाने टाकला मिठाचा खडा; भलताच प्रस्ताव मांडून नव्या वादाला सुरुवात)

ज्यावेळी १९७२चा दुष्काळ पडला होता. त्यावेळी अनेकांचे प्रचंड हाल झाले. आजही त्याबाबत ऐकले तर अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. त्याचवेळी शंकरराव भागवत हे पोटाची खळगी भरण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील चास (नारोडी) या गावतून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी स्थायिक झाले. त्यावेळी त्यांनी मराठी शाळेच्या पाठीमागे एक भाड्याने खोली घेऊन आपला लॉंड्रिचा व्यवसाय सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी गावातील सर्व शासकीय संस्था, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, दवाखाना इत्यादी सर्व कार्यालयाचे राष्ट्रध्वज स्वच्छ धुऊन व इस्त्री करून विनामूल्य देण्याचे कार्य शंकरराव भागवत आणि त्यांचे कुटुंब अविरतपणे करत आहे. त्यांची ही अनोखी देशसेवा खरच सलाम करण्याजोगी अशीच आहे. त्यांच्या या देश सेवेत त्यांचे कुटुंब देखील सहभागी होतात. येणाऱ्या पिढीने देखील ही देशसेवा अखंडपणे अशीच सुरू ठेवावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.