Farooq Abdullah : जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला देखील राम भक्तीत मग्न

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जनतेला धर्म समजून घेण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान त्यांनी कपिल सिब्बल यांच्या सांगण्यावरून रामाचे एक भजनही गायले.

209
Farooq Abdullah : जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला देखील राम भक्तीत मग्न

सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे (Farooq Abdullah) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रामाचे एक भजनही गायले.

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला ?

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) म्हणाले की, “जेव्हा भगवान रामाच्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला वचन दिले होते की तुम्ही जे काही मागाल ते मी देईन आणि त्यांनी अयोध्येच्या सिंहासनासाठी मागणी केली. त्यानुसार दशरथाचे वचन पूर्ण केले आणि रामाने त्याला अजिबात विरोध केला नाही.

(हेही वाचा – Ind vs Afg 3rd T20 : दुसऱ्या सुपरओव्हरनंतर भारताचा ३ – ० ने विजय)

कपिल सिब्बल यांच्या यूट्यूब वाहिनीवरील चर्चेदरम्यान फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) म्हणाले की; “पाकिस्तानमध्ये मौलाना असरार होते, त्यांच्याकडे कुराणवर सात भागांची पुस्तके आहेत. त्यांनीच भगवान राम आणि बुद्धांबद्दलची दोन पुस्तके लिहिली आहेत.”

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी अब्दुल्ला यांना राम भजन गाण्याची विनंती केली. त्यानंतर “माझे राम, माझे राम. माझा राम कुठे गेला? आंगन मोरा सुना, सुना.” असं भजन गायलं.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : डोंबिवलीत ६२ हजार ५०० पुस्तकांपासून साकारले श्रीराम मंदिर)

लोकांना धर्म समजून घेण्याचे आवाहन – 

या मुलाखती दरम्यान फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी लोकांना धर्म ओळखण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले, ज्या दिवशी तुम्ही धर्म समजून घ्याल, त्या दिवशी तुम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. पुढे ते म्हणाले की, आज आपल्याला देश कसा वाचवायचा याचा एकत्रित विचार करावा लागेल. जर आपण एकत्र येऊ शकलो नाही, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.