Ind vs Afg 3rd T20 : दुसऱ्या सुपरओव्हरनंतर भारताचा ३ – ० ने विजय

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये रोहीत शर्माने चेंडू तेज गोलंदाजाकडे न सोपवता चक्क रवी बिश्नोईकडे सोपवला. ही चाल यशस्वी ठरली. महम्मद नैब आणि झनत या तडाखेबाज आणि यशस्वी ठरलेल्या दोन फलंदाजांना बिश्नोईने तीन चेंडूंत बाद केलं आणि अखेर भारताने हा सामना जिंकला. त्याचबरोबर ही मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली. आणि रोहीत शर्माने कर्णधार म्हणून ४२ वा टी-२० सामना जिंकत भारताचा सर्वात यशस्वी टी-२० कर्णधार होण्याचा मानही मिळवला.

179
Ind vs Afg 3rd T20 : दुसऱ्या सुपरओव्हरनंतर भारताचा ३ - ० ने विजय

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तानच्या संघाने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये ‘जायंट कीलर’ असा लौकीक मिळवला आहे. कारण, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड अशा तगड्या संघांना हरवण्याची जिगर त्यांनी यापूर्वी दाखवून दिली आहे. बंगळुरूमध्ये (Ind vs Afg 3rd T20) भारताविरुद्ध खेळताना भारतीय संघाला याची प्रचिती येता येता राहिली. निर्धारित २० षटकांत दोघांच्या प्रत्येकी २१२ धावा झाल्यानंतर सुपर ओव्हरवर सामन्याचा निकाल लागणार होता. तर तिथेही पहिल्या षटकांत दोन्ही संघाच्या १६ धावा झाल्या. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये कर्णधार रोहीत शर्माने चेंडू रवी बिश्नोईच्या हातात सोपवला. आणि त्याने षटकांत ११ धावांचं रक्षण केलं. उलट महम्मद नाबी आणि झनत हे या सामन्यातील यशस्वी अफगाण फलंदाज बाद केले. त्यामुळे भारताला विजय साकारता आला. मालिकाही भारताने ३-० ने जिंकली. पण, अफगाण संघाचा जिगरबाज खेळही लक्षात राहिला.

(हेही वाचा – Shri Ram : श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !)

असा रंगला सामना –

पहिले दोन सामने निर्णायक जिंकल्यानंतर भारतीय संघाला (Ind vs Afg 3rd T20) बंगळुरूच्या छोट्या मैदानात पहिली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारायची होती. ती संधीही मिळाली. पण, अफगाण तेज गोलंदाजांच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीमुळे पहिल्या ६ षटकांत भारताची अवस्था ४ बाद २४ अशी झाली होती. यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे आणि संजू सॅमसन फारशी भर न घालताच बाद झाले. कोहली आणि सॅमसन तर गोल्डन डकवर बाद झाले.

त्यामुळे भारतीय संघाची सुरुवात (Ind vs Afg 3rd T20) डळमळीत झाली होती. पण, रोहीत शर्माने रिंकू सिंग सह पाचव्या विकेटसाठी नाबाद १९० धावांची भागिदारी केली. आणि त्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने २० धावांत ३ बळी टिपले.

(हेही वाचा – Badlapur MIDC Fire : बदलापूर येथील कंपनी मध्ये भीषण स्फोट ; चार ते पाच कामगार गंभीर जखमी)

कर्णधार रोहित शर्माची फटकेबाजी –

रोहीत शर्माने टी-२० (Ind vs Afg 3rd T20) मधील आपलं पाचवं शतक झळकावलं. आणि १२१ ही वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्याही नोंदवली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आज जिगरबाज खेळ केला. गुरबाझ, झरदान आणि गुलबदिन नैब या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं केली. आणि तीही जलद गतीने. त्यामुळे म्हणता म्हणता अफगाण संघ २०० धावांच्या जवळ पोहोचला. पुढे जाऊन महम्मद नाबीने १६ चेंडूंत ३४ धावा करून संघाला बरोबरीही साधून दिली. भारतीय गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी बळी टिपता आले नाहीत. शिवाय मुकेश, आवेश, शिवम आणि कुलदीप अशा चौघांनी षटकामागे १० च्या वर धावा दिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानने २० षटकांत ६ बाद २१२ धावा करत बरोबरी साधली. आणि सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे मग सुपर ओव्हरवर निकाल लागला. (Ind vs Afg 3rd T20)

सुपर ओव्हरची रंगत – 

इथंही पहिल्या षटकांत दोन्ही संघांनी प्रत्येकी १७ धावा केल्या. त्यामुळे पुढची सुपर ओव्हर आणखी रंगतदार ठरली. पहिली फलंदाजी करताना रोहीत शर्माने एक षटकार आणि चौकार ठोकून १० धावा तर केल्या. पण, तो एकेरी धाव घेऊन दुसऱ्या बाजूला गेल्यावर रिंकू सिंग शून्यावर बाद झाला. आणि त्याच्या पुढील चेंडूवर खुद्द रोहीत धावचीत झाला. (Ind vs Afg 3rd T20) सुपर ओव्हरमध्ये २ च विकेट तुम्हाला मिळतात. त्यामुळे २ बाद ११ असा भारताचा डाव संपला. आता अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी फक्त १२ धावांची गरज होती.

(हेही वाचा – Ajit Pawar : प्रत्येक विभागाने केंद्राचा अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करा)

रवी बिश्नोईची कमाल –

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये (Ind vs Afg 3rd T20) रोहीत शर्माने चेंडू तेज गोलंदाजाकडे न सोपवता चक्क रवी बिश्नोईकडे सोपवला. ही चाल यशस्वी ठरली. महम्मद नैब आणि झनत या तडाखेबाज आणि यशस्वी ठरलेल्या दोन फलंदाजांना बिश्नोईने तीन चेंडूंत बाद केलं आणि अखेर भारताने हा सामना जिंकला. त्याचबरोबर ही मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली. आणि रोहीत शर्माने कर्णधार म्हणून ४२ वा टी-२० सामना जिंकत भारताचा सर्वात यशस्वी टी-२० कर्णधार होण्याचा मानही मिळवला. (Ind vs Afg 3rd T20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.