KDMC च्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुस्तकांसह गणवेश वाटप.

91
KDMC च्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
KDMC च्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
  • कल्याण : प्रतिनिधी

सोमवारी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा पहिला दिवस कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शिक्षणाचा आनंद दिसून आला.

Maharashtra Assembly 2024 दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था 2026 06 16T115217.839

शाळेच्या पहिल्याच दिवशी पाऊल ठेवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे पाठ्यपुस्तके, आकर्षक गणवेश आणि वह्या-पेन, इत्यादी लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. प्रवेशोत्सवासोबत शाळा पूर्वतयारी अभियान हे दोन्ही महत्त्वाचे उपक्रम एकत्रितरित्या राबविण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी, सजग पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे औक्षण केले व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

Maharashtra Assembly 2024 दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था 2026 06 16T115343.852

(हेही वाचा – अभिमानास्पद! PM Narendra Modi यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान; जागतिक पातळीवरील पुरस्कारांची संख्या कितीवर?)

विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पहिल्या दिवसाच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, तसेच समग्र शिक्षा अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. महानगरपालिका (KDMC) स्तरावरून प्रत्येक शाळेच्या सनियंत्रणासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले. या पालक अधिकाऱ्यांनी आपापल्या नियुक्त शाळांमध्ये उपस्थित राहून प्रक्रियेचा आढावा घेतला. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाची शैक्षणिक उद्दिष्टे समजावून सांगत मार्गदर्शन केले. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या उत्तम समन्वयामुळे आजचा हा शाळा प्रवेशोत्सव यशस्वी ठरला. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शिक्षण विभागातील शाळांमधील शिक्षक विद्यार्थी व पालकांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाच्या शैक्षणिक वर्षातील प्रथम दिनाच्या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.