Elon Musk Drugs Consumption : एलॉन मस्क टेस्लाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उत्तेजक द्रव्य घेतात, वॉलस्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा

एलॉन मस्क उत्तेजक द्रव्य घेतात हे कर्मचाऱ्यांनाही ठाऊक आहे, असंही वॉलस्ट्रीटच्या बातमीत म्हटलं आहे. 

157
Elon Musk Drugs Consumption : एलॉन मस्क टेस्लाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उत्तेजक द्रव्य घेतात, वॉलस्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेतील वॉलस्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने शनिवारी एक खळबळजनक बातमी प्रसिद्ध केली. यात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क हे टेस्ला कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर संचालकांबरोबर उत्तेजक द्रव्याचं सेवन करतात. आणि ही द्रव्य कायद्याने परवानगी नसलेली आहेत, असंही या बातमीत म्हटलं आहे. (Elon Musk Drugs Consumption)

शिवाय मस्क यांची उत्तेजक द्रव्य सेवनाची सवय टेस्ला तसंच ट्विटर या दोन्ही कंपनीतील संचालकांना ठाऊक आहे. फक्त सेवनाचं प्रमाण चिंताजनक आहे, असं त्यांचं म्हणणं असल्याचंही वॉलस्ट्रीट जर्नलने म्हटलं आहे. याविषयी संचालक मंडळाने कधीही आक्षेप घेतलेला नाही, याची नोंद केलेली नाही किंवा तक्रारही केलेली नाही. (Elon Musk Drugs Consumption)

(हेही वाचा – India – China : चीनने मालदीवला पाठवले हेरगिरी जहाज, भारताने श्रीलंकेत उतरवली शक्तिशाली पाणबुडी)

मस्क यांनी दिली ही खोचक प्रतिक्रिया

मस्क आणि त्यांचे वकील ॲलेक्स स्पायरो यांनाही प्रतिक्रियेसाठी संपर्क करण्यात आला होता. पण, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वॉलस्ट्रीट दैनिकानेच काही दिवसांपूर्वी मस्क यांनी काही खाजगी पार्टीमध्ये कोकेन, एलएसडी, एक्स्टसी आणि सायकेडेलिक मशरुमचं सेवन केल्याची बातमी दिली होती. तेव्हा वॉलस्ट्रीटने केलेल्या बातमीत त्यांचे वरील स्पायरो यांची प्रतिक्रिया होती. आणि त्यांनी, ‘टेस्ला तसंच ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची अचानक उत्तेजक चाचणी घेतली जाते. आणि मस्क यांचे चाचणीचे अहवाल कधीही पॉझिटिव्ह आलेले नाहीत,’ असं म्हटलं होतं. (Elon Musk Drugs Consumption)

वॉलस्ट्रीटच्या ताज्या बातमीत मस्क यांच्या उत्तेजक सेवनामुळे कंपनीत निर्माण झालेल्या वातावरणाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. काही संचालकांना मस्क यांच्या भीतीमुळे उत्तेजकांचं मनाविरुद्ध सेवन करावं लागत असल्याचा दावा वॉलस्ट्रीटने केला आहे. नाव जाहीर न करता संचालकांनी वृत्तपत्राकडे दिलेली प्रतिक्रिया त्यांनी छापली आहे. (Elon Musk Drugs Consumption)

गेल्या आठवड्यात वॉलस्ट्रीटची पहिली बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा ट्विटरवर मस्क यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. ‘मी जे करत आहे, तेच मी करत रहावं असंच दिसतंय. कारण, माझ्या उत्तेजक द्रव्य सेवनामुळे जर माझ्या कंपन्या इतकी चांगली कामगिरी करत असतील, तर मला तेच करत रहायला हवं,’ अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवर दिली होती. (Elon Musk Drugs Consumption)

(हेही वाचा – Davis Cup : पाकला ३-० ने नमवत भारताचा जागतिक गटात प्रवेश)

ही कंपनीही ड्रिलिंगच्या क्षेत्रात

एलॉन मस्क सध्या ६ कंपन्यांचे प्रमुख आहेत. टेस्ला ही अर्थातच त्यांची फ्लॅगशिप कंपनी आहे. त्यानंतर त्यांनी स्पेसएक्स ही अंतराळ पर्यटन क्षेत्रातील कंपनीही सुरू केली आहे. तर ट्विटर ही सोशल मीडिया साईट दोन वर्षांपूर्वी त्यांनी विकत घेतली. न्युरालिंक ही ब्रेन इम्प्लांट बनवणारी कंपनीही त्यांनी सुरू केली आहे. आता एक्सएआय या कंपनीच्या माध्यमातून ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहेत. आणि द बोअर कंपनी ही त्यांची आणखी एक कंपनी ड्रिलिंगच्या क्षेत्रात आहे. (Elon Musk Drugs Consumption)

मागच्या एका महिन्यात वॉलस्ट्रीटने त्यांच्या उत्तेजक द्रव्य सेवनावरून केलेल्या बातमीतून मात्र ते अडचणीत आले आहेत. त्यांनी एका महिन्या पूर्वीच्या बातमीचं खंडन करताना आपल्या कार्यालयात अचानक उत्तेजक द्रव्य चाचण्या करुन घेण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. आणि या चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह आल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. (Elon Musk Drugs Consumption)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.