Davis Cup : पाकला ३-० ने नमवत भारताचा जागतिक गटात प्रवेश

रविवारी झालेल्या दुहेरीच्या सामन्यात साकेत आणि भांबरी यांचा सरळ सेटमध्ये विजय झाला. 

160
Davis Cup : पाकला ३-० ने नमवत भारताचा जागतिक गटात प्रवेश
  • ऋजुता लुकतुके

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पाकंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा त्यांच्याच मैदानावर पराभव करत भारताने जागतिक स्तरावर अव्वल गटात प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सहावा विजय आहे. पाकिस्तानने त्यांच्या अव्वल खेळाडूंच्या खेळाला साजेसा ग्रासकोर्टचा पर्याय या सामन्यासाठी निवडला होता. आणि ग्रासकोर्टवर अकील खान आणि मुझम्मील मुर्तझा यांना हरवणं तसं कठीणही होतं. (Davis Cup)

पण, भारताच्या साकेत मायनेनी आणि युकी भांबरी या जोडीने हा सामना ६-२ आणि ७-६ असा जिंकला. त्याबरोबर एकूण सामम्यातले पहिले तीन सामने जिंकत भारताने ही लढत ३-० अशी खिशात घातली. आता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या पुढच्या फेरीत भारतीय संघ जागतिक अव्वल गटात खेळेल. पाकिस्तानी संघ दुसऱ्या फळीत राहील. (Davis Cup)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : डीआरएस घ्यायचा की नाही यावर कुलदीप आणि रोहितचं मजेशीर संभाषण व्हायरल)

अशी घेतली भारताने आघाडी 

दुहेरीच्या लढतीत साकेत मायनेनीच्या आक्रमक सर्व्हिसने भारताला चांगली साथ दिली. त्याचबरोबर युकी भांबरीचे रिटर्नही नेमके आणि जोरकस होते. त्यामुळे दोघांनी पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच ४-२ अशी आघाडी घेतली. आणि ही आघाडी टिकवत त्यांनी पहिला सेट ६-२ असा खिशात टाकला. दुसऱ्या सेटमध्येही खरंतर भारतीय जोडीकडे ४-२ अशी आघाडी होती. पण, त्यानंतर पाक जोडीने सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी मिळवली. इतकंच नाही तर हा सेट त्यांनी टायब्रेकरवर नेला. इथंही सुरुवातीला ५-५ अशी बरोबरी होती. पण, पुढचे दोन गुण जिंकत भारताने टायब्रेकर ७-५ आणि हा सेट ७-६ असा जिंकत सामनाही संपवला. (Davis Cup)

भारतीय संघासमोर या सामन्यात पाकिस्तानी संघाचं आव्हान तर होतंच शिवाय पाकिस्तानमध्ये खेळण्याचंही आव्हान होतं. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सतत भोवती सुरक्षा रक्षकांचं कडं होतं. आणि खेळाडूंना मोकळेपणाने बाहेर फिरण्याचीही मुभा नव्हती. सामन्यासाठीही निमंत्रित ५०० जणांनाच स्टेडिअममध्ये प्रवेश देण्यात आला होता. (Davis Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.