Ind vs Eng 2nd Test : डीआरएस घ्यायचा की नाही यावर कुलदीप आणि रोहितचं मजेशीर संभाषण व्हायरल

9357
Ind vs Eng 2nd Test : डीआरएस घ्यायचा की नाही यावर कुलदीप आणि रोहितचं मजेशीर संभाषण व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कर्णधार रोहित शर्मा मैदानातील आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. खेळाडूंबरोबरची त्याची चर्चाही अनेकदा रंगतदार असते. अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात एकदा त्याने पंचांना उघडपणे म्हटलं होतं, ‘आधीच्या सामन्यात भोपळ्यावर बाद झालो होतो. आता ही धाव लेगबाय देऊ नको. मला खातं उघडायचंय अजून.’ अर्थात, हे तो विनोदाने म्हणाला होता. तर याच कसोटीतही रोहितने डीआरएस रिव्ह्यू घ्यावा की नाही, हे विनोदाने पंचांनाच विचारलं होतं.

तसंच जसप्रीत बुमराच्या एका चेंडूवर झॅक क्रॉली बाद आहे की नाही यावर खेळाडूंमध्ये चर्चा सुरू असताना कुलदीप आणि रोहित यांच्यातले संवाद सध्या व्हायरल झाले आहेत. बुमराच्या दुसऱ्याच षटकात एका चेंडूवर झॅक क्रॉली चकला. आणि चेंडू यष्टीरक्षक कोना भरतकडे गेला. भरतने अपील केलं. पण, त्याला स्लिपमध्ये असलेल्या रोहितची साथ नव्हती. त्याला तिसऱ्या पंचांकडे जायचीही इच्छा नव्हती. पण, कुलदीप यादव वारंवार त्याला अपील करायला सांगत होता.

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : कसोटीत शतक झळकावल्यानंतरही शुभमनला वडिलांची भीती का वाटतेय?)

कुलदीपला नाही म्हणताना रोहितने केलेला चेहरा सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. इतकंच नाही तर भारती संघाने अपील केलं नाही. आणि त्यानंतर टीव्हीवर रिप्ले दाखवण्यात आला त्यात चेंडूने बॅटची कडा घेतली नसल्याचं उघड झालं. तेव्हा मैदानातील प्रेक्षकांनीही रोहितच्या नावाचा पुकारा केला. कारण, रोहित अपील करू इच्छित नव्हता, हे एव्हाना प्रेक्षकांनाही समजलं होतं. आणि रोहितनेही दोन हात उंचावून प्रेक्षकांचं कौतुक स्वीकारलं. हा छोटा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

झॅक क्रॉलीने बेन डकेटच्या साथीने इंग्लंडला दुसऱ्या डावात अर्धशतकी सलामी करून दिली. क्रॉलीपेक्षा डकेट आक्रमक होता. आणि त्याने वेगवान २७ चेंडूंत २८ धावा केल्या. पण, १३व्या षटकांत रवीचंद्रन अश्विनचा एक चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नांत चेंडू त्याची बॅट आणि हाताला लागून हवेत उडाला. आणि कोना भरतने सूर मारून अप्रतीम झेल टिपला. भारताला तिसऱ्या दिवशी हे एकमेव यश मिळालं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.