Pakistan : पाकिस्तानात दहशतवादी हल्ला; १० जणांचा मृत्यू

154

पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दरबार शहरातील एका पोलीस ठाण्यावर सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकीच्या ३ दिवस आधी हा हल्ला झाला. येथे ८ फेब्रुवारीला निवडणूक आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

(हेही वाचा Nexalist : मुंबईसह ५ शहरे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर; काय आहे पोलिसांचा अहवाल?)

दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे ३ वाजता दरबार शहरातील पोलीस ठाण्यावर हल्ला केला. त्यांनी पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि ग्रेनेड फेकले. यानंतर गोळीबार सुरू झाला. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानमध्ये (Pakistan)  हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ले तीव्र झाले आहेत. बलुच लिबरेशन आर्मी बलुचिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan)  तालिबान खैबरमध्ये हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दरबार शहरातील एका पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. निवडणुकीच्या ३ दिवस आधी हा हल्ला झाला. येथे ८ फेब्रुवारीला निवडणूक आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.