ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या आधीच इतका अमली पदार्थांचा साठा जप्त

63

आता नाताळ आणि थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पार्टी करण्याची योजना आखली असेल, पण त्या पार्टीत जर का अमली पदार्थाच्या सेवनाचा काही प्लॅन आखला असेल, तर तुमच्यावर मुंबई पोलिसांचे लक्ष तर आहेच सोबत तपास यंत्रणाही सक्रिय आहेत, हे लक्षात घ्या. नाताळ आणि थर्टी फस्टमुळे ड्रग्ज तस्कर, पुरवठादार पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

गेल्या 11 महिन्यांत मुंबई पोलिसांनी 132 कोटीचे ड्रग्ज जप्त केले असून, साडेसहा हजारांहून अधिक जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी विभागासह स्थानिक पोलिस ठाण्यांकडून शहरातील ड्रग्ज पेडलर्स आणि ड्रग्ज सेवन करणा-यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंवर दरम्यान मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी 555 गुन्हे नोंदवत 695 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 132 कोटी 24 लाख 80 हजारांचे 3 हजार 961 किलो 56002 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

छुप्या पार्ट्यांवर करडी नजर

यात सर्वाधिक गांजाचे 318 गुन्हे दाखल करुन, 362 आरोपींना अटक केली. शहरातील नशेखोरांवरही मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु ठेवत, अमली पदार्थ सेवनाचे 5हजार 397 गुन्हे दाखल केले आहेत. यात 5 हजार 883 नशेखोरांना अटक केली आहे. नाताळ आणि थर्टी फस्ट निमित्ताने छुप्या पार्ट्याची लगबग करणा-यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे. त्यानुसार, सध्या गणवेशातील पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

( हेही वाचा: 2014 साली हिंदूत्ववादी शिवसेनेला कोणी दूर केले? संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.