Drugs Seized : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, मुंबई पोलिसांचा कारखान्यावर छापा

पोलिसांनी तातडीने कारवाई करून सोलापुरातील कारखान्यावर छापा टाकला

38
Drugs Seized : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अमली पदार्थ जप्त
Drugs Seized : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई पोलिसांनी खार आणि सोलापूर येथे केलेल्या कारवाईत ११६ कोटींचे मेफेड्रॉन बनवण्यासाठी लागणारा १०० कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त केला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी कोटींचे अमली पदार्थ जप्त (Drugs Seized) केले आहेत. नाशिकनंतर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांचे आणखी एक रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर संशयितांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांनी खास (पश्चिम) येथे दोघांना काल रात्री अटक केली होती. यातील एक संशयित ३२ वर्षांचा, तर दुसरा संशयित तरुण २७ वर्षांचा आहे. या दोघांकडून ५,०८९ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याची किंमत १० कोटी १७ लाख ८० हजार इतकी आहे. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता सोलापुरात मेफेड्रोनचा कारखानाच सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून सोलापुरातील कारखान्यावर छापा टाकला आणि ३ किलो मेफेड्रोन जप्त केले. याशिवाय मेफेड्रोन निर्मितीसाठी लागणारा तब्बल १०० कोटींचा कच्चा माल जप्त केला.

(हेही वाचा – Supreme Court : ‘गर्भाचे धडधडणे थांबवू शकत नाही…’ गर्भवती महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली )

गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये ३००कोटींचे ड्रग्ज पकडले होते, तर गेल्या काही वर्षात सोलापुरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. २०१६मध्ये ठाणे पोलिसांनी सोलापुरातील एका कारखान्यावर कारवाई करत तब्बल २ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.