Dombivli : शिवमंदिर स्मशानभूमीला मिळणार नवा लूक; ३०० दिवसांत होणार सुशोभिकरण

70
Construction work at the new crematorium site in Dombivli.
Dombivli : शिवमंदिर स्मशानभूमीला मिळणार नवा लूक; ३०० दिवसांत होणार सुशोभिकरण
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli                  डोंबिवलीच्या पूर्वेतील दत्तनगर परिसरात असलेली जुनी स्मशानभूमी ही ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील आहे. या स्मशानभूमीत डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण भागातून पार्थिव दहनासाठी आणले जातात. गेल्या सहा-सात वर्षांच्या कालावधीत स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पार्थिवांचे मंचकावर दहन होत असताना पावसाचे पाणी त्यावर पाडण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आता ही स्मशानभूमी तोडून त्याठिकाणी आधुनिक पध्दतीच्या नवीन स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने डोंबिवलीच्या दत्तनगर येथील शिवमंदिर परिसरातील जुन्या स्मशानभूमीचा कायापालट येत्या ३०० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Dombivli)

गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे डोंबिवलीकर प्रचंड त्रस्त झाले होते. पावसाळ्यात संपूर्ण परिसरात चिखल आणि पाणी साचत असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था नीटनेटकी नसल्याने तासन् तास उन्हा-पावसात थांबावे लागत असे. शेड असूनही नसल्यासारखी असल्याने कधी कधी तर अंत्यसंस्कार अर्ध्यातच थांबवण्याची वेळ अनेकदा आली होती. पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आणि लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी येणे म्हणजे मोठीच कसरत होती. या सर्व समस्यांबाबत स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे निवेदन देऊन स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती. (Dombivli)

अखेर नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले आहे. याबतचा कार्यादेश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केला आहे. कार्यादेशांनुसार या कामाची जबाबदारी मे. केम सर्व्हीसेस या ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे. या योजनेनुसार आधीची जुनी आणि मोडकळीस आलेली स्मशानभूमी पूर्णपणे तोडून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त अशी नवीन स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येत आहे. नवीन स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी बसण्याची सोय म्हणून प्रशस्त प्रेक्षक गॅलरी बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पावसापासून संरक्षणासाठी मोठा शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. जेणेकरून नातेवाईकांना सन्मानाने आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचा निरोप देता येईल. महानगरपालिकेने या कामासाठी ३०० दिवसांची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे हे सर्व काम ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातील ही एकमेव मोठी स्मशानभूमी असल्याने हजारो नागरिक या स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गैरसोय दूर होणार असून नागरिकांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Dombivli)

(हेही वाचा – Dombivli : शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण; आधारवाडी कारागृहात आरोपींची ओळख परेड)

इतर स्मशानभूम्यांत सोयी-सुविधा उपलब्ध

आयुष्याच्या दगदगीसह जबाबदारीतून कायमची चिरनिद्रा घेण्याचे व इहलोकातून कायमचे अस्तित्व मिटवणारे एकमेव ठिकाण असलेल्या स्मशानभूमीत मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत असतील तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतलेला नूतनीकरणाचा निर्णय योग्य आहे का? असा सवाल उपस्थित करत मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमी नुतनीकरणासाठी पूर्ण बंद करण्यापूर्वी शहरातील इतर स्मशानभूम्यांमध्ये सुविधांसह २४ तास कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने शहरातील इतर स्मशानभूमी सोयी-सुविधांसह कार्यरत करून तेथे २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.(Dombivli)

(हेही वाचा – Drug Disposal Maharashtra : ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले; पुण्यासह धुळ्यात १२ कोटींचा ड्रग्जसाठा नष्ट)

असा असणार नवा लूक

या स्मशानभूमीत दहन मंच, नागरिकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृह, निवारा, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, लाकडांच्या वखारीसाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहनतळ, आदी सुविधा असणार आहेत, असे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.