राज्यासह देशभरात अमली पदार्थांच्या (Drug) घटनांमध्ये वाढ होत आहे. या अमली पदार्थांच्या व्यसनात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकत चालली आहे. तसेच अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) पुणे आणि धुळे जिल्ह्यांत जप्त केलेल्या अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट (Drug disposal) लावली आहे. यामध्ये एकूण ९ हजार ५३६ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १२ कोटी २९ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली. (Drug Disposal Maharashtra)
(हेही वाचा – Eye Check-up Camp : महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर संपन्न)
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीत जप्त (Enviro Power Limited Company) अमली पदार्थांचा निपटारा करण्यात आला. तर धुळे जिल्ह्यात विविध कारवायांदरम्यान मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या गांजाचाही याच प्रक्रियेद्वारे नाश करण्यात आला. (Drug Disposal Maharashtra)
(हेही वाचा – Bombay High Court चा थेट दणका: संपकरी डॉक्टरांना कामावर परतण्याचा कडक इशारा; अन्यथा होणार मोठी कारवाई)
पुणे आणि धुळे जिल्ह्यांतील जप्त अमली पदार्थांची विल्हेवाट उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (Drug Disposal Committee) आणि घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (आरडीडीसी) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

