“बांगलादेश कसला हा तर दुसरा पाकिस्तान…”, Sheikh Hasina यांच्या मुलाचे मोठे विधान! भारतालाही दिला इशारा

“बांगलादेश कसला हा तर दुसरा पाकिस्तान...”, Sheikh Hasina यांच्या मुलाचे मोठे विधान! भारतालाही दिला इशारा

64
Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement
Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement

“बांगलादेश आता एक अपयशी देश बनत चालला असून तो दुसरा पाकिस्तान होत आहे”, असे विधान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सुपुत्र आणि अवामी लीगचे वरिष्ठ नेते साजीब वाजेद जॉय (Sajeeb Wazed Joy)यांनी केले आहे. बांगलादेशमधून पदच्युत झालेल्या शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या भारतातून संवाद साधला. शेख हसीना यांच्याबरोबरच जॉय यांनीही संवाद साधला होता. त्यात बोलत असताना त्यांनी बांगलादेशबद्दल चिंता व्यक्त केली.(Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement)

बांगलादेश दहशतवादाचे केंद्र बनू शकते

साजीब वाजेद जॉय म्हणाले, “२०२४ मध्ये बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने आताच हस्तक्षेप केला नाही तर बांगलादेश या क्षेत्रातील सर्वात मोठे दहशतवादाचे केंद्र बनू शकते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशमध्ये काम करत आहे”, असा आरोप जॉय यांनी केला. तसेच अवामी लीग पक्षाचे सरकार असताना अटक केलेले किंवा तुरुंगात असलेल्या शेकडो अतिरेक्यांना मुक्त करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.(Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement)

बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनला आहे

भारताच्या पूर्वेकडील सीमेला लागून असलेला बांगलादेश आता दुसरा पाकिस्तान बनला आहे, असे सांगून जॉय यांनी हा भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचे म्हटले. जर ही परिस्थिती बदलली नाही तर जगातील पुढचे अतिरेकी हे बांगलादेशामधून तयार होतील. भारतातील माध्यमांनी यावर विशेष लक्ष देऊन वार्तांकन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.(Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement)

सत्तांतरानंतर हत्यांचे सत्र

मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडली आणि ते एक अराजक राष्ट्र बनू लागले, असाही आरोप जॉय यांनी केला. शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये हत्यांचे सत्र सुरू झाले. सरकारने ५ ऑगस्ट २०२४ पासून राजकीय हत्यांना कायदेशीर मान्यता दिली. जुलै २०२४ मधील आंदोलनात मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येवर जॉय यांनी प्रश्न उपस्थित केला. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार या आंदोलनात जवळपास १४०० लोक मृत्यूमुखी पडले होते. तर सरकारने मात्र हा आकडा ८०० असल्याचे म्हटले. मग वरील ६०० लोक कोण होते? अवामी लीग पक्षाने मृतांच्या नावाची माहिती मागितली पण दिली गेली नाही, असेही जॉय म्हणाले.(Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.