Dombivli MIDC Blast: मृतांचा आकडा पोहोचला ६ वर, बॉयलरचा स्फोट झाला अन्…

डोंबिवलीतल्या बॉयलर स्फोटात मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे.

150
Dombivli MIDC Blast प्रकरणी मालती मेहताला नाशिकमधून अटक 

डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC Blast) केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर इतर छोटे स्फोट झाले. या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. तसेच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या ४० हून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. बचावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Dombivli MIDC Blast)

डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivli MIDC Blast) मधील अमुदान केमिकल कंपनीमधील (Amudan Cemical Company) बॉयलरचा स्फोट झाला. ही कंपनी फेज दोन मध्ये येते. या स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच हॉटेल्स आणि ऑफिस आणि गाड्यांच्या काचा देखील फुटल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devdendra Fadanvis) यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आधी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या जखमींना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

(हेही वाचा – ‘काँग्रेसचं सरकार ७ जन्मात येणार नाही’; हरयाणामधून PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल )

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे. ८ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भात ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.