Lok Sabha Elections : राजकीय कुंपणावरील इच्छुक कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत, निवडणूक निकालाकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना अपेक्षित राजकीय पक्षांकडून तिकीट नाकारण्यात आले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाचा आधार घेत उड्या मारल्या. आता त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

160
Lok Sabha Elections : राजकीय कुंपणावरील इच्छुक कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत, निवडणूक निकालाकडे लक्ष

लोकसभा निवडणूक पार पडली आणि आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत. निवडणूक निकालात कुणाची हवा जास्त आहे यावर कुंपणावर बसलेल्या अनेक आमदार, माजी नगरसेवक आणि महत्वाकांक्षी, इच्छुक यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यास पुन्हा एकदा या राजकारण्यांच्या सत्तेच्या दिशेने कोलांटउड्या पाहावयास मिळतील. (Lok Sabha Elections)

तिकीट नाही, मारली उडी

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना अपेक्षित राजकीय पक्षांकडून तिकीट नाकारण्यात आले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाचा आधार घेत उड्या मारल्या. आता त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यात भाजपाचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील, धैर्यशील मोहिते, मनसेचे वसंत मोरे अशा काही मंडळींचा समावेश आहे. उन्मेष पाटील यांनी शिवसेना उबाठात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांनी स्वतःसाठी तिकीट नाकारले तरी त्यांच्या जवळचे कार्यकर्ते करण पवार यांना उबाठाचे लोकसभा तिकीट मिळवून दिले. मोहिते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत तर मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा आधार घेतला. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – BMC : आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पोहोचले नाले आणि नदीच्या काठावर, अचानक भेटीत काय दिसले?)

पूर्व-पश्चिम उपनगरात उबाठाचे नाराज

महाविकास आघाडीत जसे काही नाराज आणि द्विधा मनस्थितीत आहेत, तसे महायुतीतही आहेत. विशेषतः शिवसेना उबाठा गटातील काही आमदार पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे काम करण्यास मनापासून उतरले नसून उबाठाला किती यशापयश मिळते, यावर त्यांची पुढील राजकीय भूमिका आणि निर्णय अवलंबून असेल, असे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पूर्व उपनगरातही काही आमदार असेच कुंपणावर बसून असल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून केव्हाही उडी मारू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Lok Sabha Elections)

महायुतीतही नाराज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतदेखील काही नाराज आणि संभ्रमावस्थेत असल्याचे बोलले जात आहे. सध्या महायुतीत असलेले खासदार गजानन कीर्तिकर हे त्यांच्या मुलाविरुद्ध (अमोल कीर्तिकर) सुरू असलेल्या ईडी कारवाईमुळे नाराज असल्याचे समजते. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले छगन भुजबळ हे त्यांच्या पुतण्याला (समीर भुजबळ) भाजपाने तिकीट देण्यास विरोध केल्याने नाराज असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांनी संयम ठेवला असून, यांच्याप्रमाणे इतरही अनेक लोकसभा निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.