-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli गणेशोत्सव जवळ येत असताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध शिल्पकार गुणेश आडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार आहे. (Dombivli)
(हेही वाचा – ODI World Cup 2027 : ३ देशांतील १२ स्टेडिअमवर रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचे सामने)
१४ वर्षे व त्यापुढील वयोगटातील इच्छुकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ आणि रविवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मूर्तीला रंगकाम शनिवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात येणार आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Vasai: तांत्रिक बिघाडामुळे धावती मालगाडी डबे सोडून पळाली, स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ चित्रीत करून केला व्हायरल)
ही कार्यशाळा ना नफा ना तोटा या तत्त्वावर राबवली जाणार आहे. कार्यशाळेचे ठिकाण श्री गणेश मंदिर संस्थान इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील वक्रतुंड सभागृहात असणार आहे. अधिक माहितीसाठी श्री गणेश मंदिर संस्थानच्या ९०८२४११०५४ आणि पर्यावरण दक्षता मंडळ ९८३०४६३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

