Dombivali City : रुग्णवाहिका अडकली फेरीवाल्यांच्या विळख्यात; व्हायरल व्हिडिओतून विदारक दृश्य समोर

191
Crowded street in Dombivali with vendors and umbrellas
Dombivali City : रुग्णवाहिका अडकली फेरीवाल्यांच्या विळख्यात; व्हायरल व्हिडिओतून विदारक दृश्य समोर
  • डोंबिवली, प्रतिनिधी 

पूर्वेतील इंदिरा चौकापासून कामत मेडिकल पदपथ, स्टेशन परिसर, उर्सेकरवाडी, पूजा-मधुबन सिनेमागृह गल्लीपर्यंतचा संपूर्ण भाग आपल्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात परप्रांतीय फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करून व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांनी उर्सेकरवाडी जाम करून टाकली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास उर्सेकरवाडीतील पूजा-मधुबन सिनेमागृहा समोर असलेल्या एका खासगी रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून खळबळ उडवून दिली आहे. रुग्णसेवेपेक्षा फेरीवाल्यांचा कळवळा येणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह शासन/प्रशासनावर राजू पाटील यांनी निशाणा साधला आहे. (Dombivali City)

सायंकाळी घरी परतण्याच्या ओढीने स्टेशनात पाऊल टाकताच फेरीवाले डोंबिवलीकरांची वाट अडवतात. डोंबिवलीत फेरीवाल्यांना नव्हे तर पादचाऱ्यांसाठी ना पादचारी क्षेत्र तयार करण्यात आले आहे. रेल्वे पूल, रस्ते, फूटपाथच नव्हे, तर हमरस्त्यांवरील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. उर्सेकरवाडी तर फेरीवाल्यांचा मोठा अड्डा मानला जातो. ब्रम्हदेव जरी उतरला तरी या गल्लीतील फेरीवाले हटू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सुरू आहे. फुटपाथ तर येथे आढळूनच येत नाही. फेरीवाल्यांना संपूर्ण रस्ता व्यापला आहे. दुकानांसमोर फेरीवाले अनधिकृतपणे ठाण मांडून बसले आहेत. यातील बहुतांशी फेरीवाले डोंबिवली बाहेरचे असून फेरीवाल्यांचा बुरखा घालून डोंबिवलीतील रस्त्यांवर कब्जा केलेल्या या गुंडांपासून खरेदीदारांना विशेषत: गृहिणींना नेहमीच धोका असतो. (Dombivali City)

उर्सेकर वाडीच नव्हे तर स्टेशन परिसरातील सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले असल्याने गृहिणींना या रस्त्यांतून वाट काढताना अंग चोरून चालावे लागते. स्थानिक फेरीवाल्यांवर देखील परप्रांतीय फेरीवाल्यांनी हुकूमत असते. वेळप्रसंगी शस्त्राचा वापर करणाऱ्या या गुंडांच्या नादी कोण लागणार ? या भीतीने केडीएमसीचा कुणीही अधिकारी कारवाईसाठी पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र याच फेरीवाल्यांकडून मिळणारी मलई वरपर्यंत पोहोचत असल्याने रुग्णवाहिकेतील रुग्ण रुग्णालयात पोहोचला काय आणि फेरीवाल्यांच्या कोंडमाऱ्यात अडकून मेला काय ? याचे अशा अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. (Dombivali City)

दुकानांसमोर फेरीवाले अनधिकृतपणे ठाण मांडून बसले आहेत. यातील बहुतांशी फेरीवाले डोंबिवली बाहेरचे असून फेरीवाल्यांचा बुरखा घालून डोंबिवलीतील रस्त्यांवर कब्जा केलेल्या या गुंडांपासून खरेदीदारांना विशेषत: गृहिणींना नेहमीच धोका असतो. स्थानिक फेरीवाल्यांवर देखील परप्रांतीय फेरीवाल्यांनी हुकूमत असते. वेळप्रसंगी शस्त्राचा वापर करणाऱ्या या गुंडांच्या नादी कोण लागणार ? या भीतीने केडीएमसीचा कुणीही अधिकारी कारवाईसाठी पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र याच फेरीवाल्यांकडून मिळणारी मलई वरपर्यंत पोहोचत असल्याने रुग्णवाहिकेतील रुग्ण रुग्णालयात पोहोचला काय आणि फेरीवाल्यांच्या कोंडमाऱ्यात अडकून मेला काय ? याचे अशा अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. (Dombivali City)

रुग्णवाहिकेच्या चालकावर दहशत

महिन्याभरापूर्वी याच उर्सेकर वाडीत असलेल्या खासगी रुग्णालयाशी संबंधित रुग्णवाहिकेचा चालक गणेश माळी याला उन्मत्त फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर मनसेने आंदोलन करत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटावची मागणी केली. केडीएमएसी प्रशासनाने महिनाभर स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त केला. मात्र आता कारवाई थंड झाली आणि फेरीवाले पुन्हा रस्त्यावर आले. त्याच उर्सेकर वाडीत असलेल्या खासगी रूग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी आलेली रूग्णवाहिका फेरीवाल्यांच्या विळख्यातून निघत नव्हती. या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून एकच खळबळ उडवून दिली आहे. (Dombivali City)

(हेही वाचा – Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील उद्योग, सामाजिक न्यायासह अन्य निर्णय वाचा एका क्लिकवर…)

एक्स पोस्टने केला पर्दाफाश

डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्याने वाहतूक कोंडी कायम आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतो. मनसे नेते राजू पाटील यांनी उर्सेकर वाडीतील एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यात एक रुग्णवाहिका अडकली आहे. फेरीवाल्यांचा प्रश्न सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. त्याचा फटका पादचारी/चाकरमान्यांसह रुग्णवाहिकांनाही बसत सहन करावा लागत आहे. एक रुग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला. हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे. हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी डॉक्टर असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या समस्यांची नाडी पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुद्धा मनाई आहे. प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे. बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे, मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून वोटचोरी करून आमदारही झाले… अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करून राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड घेतली आहे. (Dombivali City)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.