Dhule : शिष्यवृत्तीचा पैसा विद्यार्थ्यांऐवजी शाळेच्या खात्यात ? १५ दिवसांत चौकशीचे आदेश !

159
Dhule : शिष्यवृत्तीचा पैसा विद्यार्थ्यांऐवजी शाळेच्या खात्यात ? १५ दिवसांत चौकशीचे आदेश !
Dhule : शिष्यवृत्तीचा पैसा विद्यार्थ्यांऐवजी शाळेच्या खात्यात ? १५ दिवसांत चौकशीचे आदेश !

धुळे(Dhule) जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेवर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवून निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. बोगस शिक्षक भरती आणि बनावट विद्यार्थी पटसंख्या दाखवून सरकारी निधीचा अपहार केल्याचा मुद्दा विधानभवनातच गाजला.

न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी संचलित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर येणारी शिष्यवृत्ती(Scholarships) थेट शाळेच्या खात्यात जमा करून ती काढल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. विशेष म्हणजे, तक्रार केल्यानंतरच ती रक्कम पुन्हा जमा करण्यात आली. पण या प्रकाराकडे शिक्षण विभागाने(Department of Education) डोळेझाक केली का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

(हेही वाचा – Pansare Murder Case : प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर डॉ. तावडे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा)

या प्रकरणावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे(Anna Bansode) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. विधानभवनात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, धुळे(Dhule) जिल्हा परिषद सीईओ अजीज शेख, शिक्षण अधिकारी डॉ. मनीष पवार, तक्रारदार शोभा अल्लोर पाटील व शाळा प्रशासनाला जाब विचारला.

बनसोडे यांनी वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक निधी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले असून, १५ दिवसांत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.